लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित सेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथ्या वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार मंजुळ गावित, माजी खासदार बापूसाहेब चौरे, शांताई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप बधान, संस्थेच्या सचिव सुनंदा बधान, सुभाष बधान, किशोर बधान, म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट, निजामपूरचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, ललित आहुजा, रुपेश बधान शांताई एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक संकेत बधान, रवींद्र सोनवणे, योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, ललित चौरे आदी उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी झलक महाराष्ट्राची यावर आधारित विविध देखावे सादर केले. या देखाव्यातून महाराष्टÑातील विविध सण, उत्सव, परंपरांचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सूत्रसंचलन केले. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस प्रदान करुन गौरविण्यात आले. कार्यक्रमास पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सेयान इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने मिळविली उत्स्फूर्त दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:14 IST