शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची कारला धडक, ७ जखमी; शिरपूर तालुक्यातील तोंदे शिवारातील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: July 3, 2023 17:47 IST

तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कारचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

धुळे -  भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि कारची धडक झाली. यात कारमधील ७ प्रवासी जखमी झाले. ही घटना शिरपूर-चोपडा रस्त्यावरील तोंदे शिवारात शनिवारी रात्री घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाविरोधात रविवारी थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमएच १८ बीझेड ६४८८ क्रमांकाचा ट्रक शिरपूरकडून भरधाव वेगाने येत होता. शिरपूर-चोपडा रोडवरील तोंदे शिवारात अनेर नदीच्या पुलाजवळ समोरून येणारी एमएच १८ बीसी ४३२१ क्रमांकाच्या कारला आरशाला ट्रक चालकाने कट मारला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनेर पुलाच्या कठड्याला कार ठोकली जावून अपघात झाला. कारचालकासह कारमध्ये बसलेले प्रवासी यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात राधेशाम कसाराम उर्फ केगडा पावरा, अविनाश बुधा पावरा, संजय गंगाराम पावरा, तोताराम मोतीलाल पावरा, अजित भीमसिंग पावरा, माेहन भगवान कोळी, विनोद सखाराम पावरा (सर्व रा.शिरपूर) यांना दुखापत झाली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कारचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

राधेशाम कसाराम उर्फ केगडा पावरा यांनी थाळनेर पोलिसात रविवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शाहबाजखान अरीफखान (वय २८,रा. बलगव, कसरावद, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.