शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 16:31 IST

जलयुक्त शिवार योजना : विभागीय आयुक्त घेणार आढावा; ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार कामे

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी (२०१७-२०१८) १,६२२ कामे ही प्रस्तावित आहे. त्यापैकी १,२०१ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनासमोर आहे.दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेच्या २०१८-२०१९ या चौथ्या टप्प्यासाठी जिल्ह्यात गावे निश्चितीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या २०१६-२०१७ या टप्प्यासाठी मंजूर २,५९५ कामांपैकी २,२९० कामांचा अंतिम आराखड्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, मंजूर कामांपैकी १,८१७ कामे पूर्ण झाली असून ४२३ कामे अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी कृषी व वनविभागाची यंत्रणा गतिमान झाली आहे. प्रलंबित कामे ३१ मार्चच्या आत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून जलयुक्त योजनेंतर्गत झालेल्या कामांचा आढावा विभागीय आयुक्त महेश झगडे घेणार आहेत. जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले होते. प्राप्त माहितीनुसार धुळे जिल्ह्यात जलयुक्त योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे ही पूर्ण झाली आहे. दुसरा टप्प्यासाठी (२०१६-२०१७) जिल्ह्यात १२३ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये २२९० कामांचा आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजूर करून दिला होता. त्यानुसार १,७७१ कामे पूर्ण झाली आहे. तर उर्वरीत ४२३ कामे ही प्रलंबित राहिली आहे. या कामांपैकी ३४३ कामे ही प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही सर्व कामे कृषी व वनविभागांतर्गत केली जात आहे. पाणीसाठ्यात झाली वाढ जिल्ह्यात झालेल्या जलयुक्तच्या कामांमुळे ६३८९.५३ टीसीएम जलसाठा तयार झाला आहे. या जलसाठ्यामुळे शेतकºयांची चिंचा मिटली असून पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. 

जलयुक्तच्या कामांसोबत ‘जिओ टॅगिंग’चे ही काम जलयुक्त शिवार योजनेच्या कामे पूर्ण झाल्यानंतर निधीसाठी समवर्ती व त्रयस्थ मूल्यमापन, जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निधी दिला जाणार आहे.  त्यानुसार समवर्ती मूल्यमापनात कामे सुरू होण्यापूर्वीची स्थिती, त्रयस्थ मूल्यमापन प्रक्रियेत कामे पूर्ण झाल्यावर त्रयस्त समितीमार्फत पाहणी व जिओ टॅँगिंग प्रकारात काम सुरू होण्यापूर्वी, पूर्ण झाल्यावरच्या कामांचे छायाचित्रांचा अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर कामांसाठी मंजूर झालेला निधी शासनामार्फत दिला जाणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांसोबत ‘जिओ टॅँगिग’ चे कामही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.