शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पोलीस महानिरीक्षक धुळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:25 IST

गजानन कॉलनी : सोशल मिडीयावर वॉच

ठळक मुद्देगजानन कॉलनीत तणावपुर्ण शांततापोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखलपोलीस अधीक्षक यांच्याकडून शांततेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ऐंशी फुटी रोडवर असलेल्या अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात बुधवारी रात्री तणाव निर्माण झाला होता़ आता परिस्थिती नियंत्रणात आहे़ कोणीही अफवा पसरू नये़ सोशल मिडीयावर पोलिसांचा वॉच आहे, असे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी स्पष्ट केले आहे़ दरम्यान, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे धुळ्यात दाखल झाले आहेत़ शहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन दोन समुदायात दंगल उसळली़ काय होत आहे, हे समजण्याच्या आत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आल्यामुळे परिस्थिती देखील गंभीर झाली होती़ आरडा-ओरड होत असताना घोषणाबाजीही करण्यात आल्याने अधिकच तणाव वाढला होता़ घटनास्थळी दगडांचा खच पडलेला होता़ पोलीस घटनास्थळी दाखलघटनेचे गांभिर्य आणि वाढणारा तणाव लक्षात घेता पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, जितेंद्र सपकाळ, दिलीप गांगुर्डे, दत्ता पवार, दिवाणसिंग वसावे, सरिता भांड, अभिषेक पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे पोलिसांच्या मदतीला बाहेरुन देखील बंदोबस्त तात्काळ मागविण्यात आला आहे़ त्यात जळगाव , नंदूरबार आणि नाशिक ग्रामीणमधून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अफवा कोणीही पसरु नये़ सोशल मिडीयावर पोलिसांची नजर आहे़ याकामी सायबर सेल सतर्क असून घटनेवर आणि सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे़ कोणी अफवा पसरविताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिला आहे़ दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे धुळ्यात आले आहेत़ त्यांनी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार आणि वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेवून घटनेचा आढावा घेत आहेत़