शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीरच्या तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:08 IST

शिरपूर : सावळदे तापी पुलावरून घेतली नदीत उडी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावालगत असलेल्या तापी पुलावरून सोनगीर येथील एका २८ वर्षीय तरूणाने तापीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली़ मयत हा शिरपूर टोल नाक्यावर कामाला होता़शनिवार १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास सोनगीर येथील अधिकार राजेंद्र माळी याने सावळदे गावालगत असलेल्या तापी पुलावरून उडी मारल्याची माहिती शिरपूर टोलनाक्यावर देण्यात आली़ तेथील कर्मचाºयांनी सोनगीर येथे त्याच्या नातेवाईकांना कळविल्यानंतर आप्तजणांनी सावळदे पुलावर धाव घेतली़  पट्टीचे पोहणारे श्रीराम कोळी, कैलास कोळी, उत्तम सोनवणे, भिम कोळी यांनी नदीच्या पात्रात मृतदेह शोधण्यास सुरूवात केली़ सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अधिकार माळी याचा मृतदेह शिंदखेडा तालुक्यातील दभाषी शिवारात मिळून आला़   यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न सोनगीर : येथील अधिकार राजेंंद्र माळी (२३) असे त्याचे नाव आहे. तो शिरपूर टोलप्लाझावर टोल वसुलीचे काम करीत होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मयत अधिकार माळी टोलप्लाझावर नियमितपणे व व्यवस्थित काम करीत होता. गेल्या तीन दिवसांपासून तो अस्वस्थ होता. म्हणून तीन दिवसांपुर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र टोलप्लाझावरील कर्मचाºयांनी त्याची समजूत घातली. आत्महत्येचे विचार असल्याचे तो बोलत होता असेही सहकारी कर्मचारीकडून ऐकायला मिळाले. दरम्यान आज दुपारी तो त्याची एमएच १८ बीजे ८३७३ या क्रमांकाच्या दुचाकीने तो शिरपूरकडे गेला. दीडच्या सुमारास त्याने तापी नदीत उडी घेतली तेव्हा दोन वाहनचालकांनी दोर फेकून त्याला वाचवायचा प्रयत्न केला पण त्याने दोर पकडला नाही असेही समजते. त्याच्या मोटारसायकलवरून त्याची ओळख पटून त्याचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस नाईक भीमराव बोरसे तपास करीत आहेत. त्याचे वडीलांचे छत्र यापुर्वीच हरवले आहे. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे