लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील सोनगीरनजिक हॉटेलवर सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी पहाटे दरोडा टाकला़ मालकावर हल्ला चढवत त्यांच्या खिशातून अडीचशे रुपये हिसकावून नेले़ झटापटीत ३ जणांना दुखापत झाली़ सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर धुळे तालुक्यातील सोनगीर हद्दीत असलेल्या सरवड गावालगत असलेल्या हॉटेल भाऊ येथे सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकला़ यात ३ ते ४ जणांचा दरोडा टाकण्यात समावेश होता़ दरोडेखोरांनी हॉटेल मालकावर हल्ला चढवत हॉटेलमधील गल्ल्यातील सुमारे ३ हजार रुपये काढले़ याशिवाय त्यांनी हॉटेल मालकाच्या पॅन्टच्या खिशातून २५० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले़ या झटापटीत ३ जण जखमी झाले आहेत़ घटनेचे गांभिर्य पाहून दरोडेखोरांनी घटनास्थळांवरुन पळ काढला़ याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते़
सोनगीरनजिक पहाटे दरोडा तीन लोकांना दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:30 IST
पहाटेचा थरार : अडीचशे रुपये हिसकाविले
सोनगीरनजिक पहाटे दरोडा तीन लोकांना दुखापत
ठळक मुद्देसोनगीरनजिक महामार्गावरील हॉटेलवरचा थरारबळजबरीने हिसकाविले खिशातून पैसेसोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु