शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टपाल वाटपाच्या कामातून मिळते समाधान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:38 IST

ज्योती सोनवणे : मोहाडी विभागातील पहिल्या महिला टपाल कर्मचारी 

सुरेश विसपुते

धुळे : जे काम पूर्वी केवळ पुरूष करत होते, अशी अनेक कामे सध्या महिला लिलया करू लागल्या आहेत. टपाल वाटपाचे कामही त्यातच मोडणारे. त्यामुळे पोस्टमन हा शब्द रूढ झाला. परंतु आता टपाल खात्यातील विविध कामांची जबाबदारी महिला समर्थपणे पेलत आहेत. शहरातील मुख्य टपाल कार्यालयांतर्गत येणाºया मोहाडी विभागात ज्योती अमृत सोनवणे या गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असून नागरिकांना टपाल वाटप करण्याच्या  कामात समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले. मोहाडी विभागातील त्या पहिल्याच महिला टपाल कर्मचारी आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा आपले अनुभव व्यक्त केले. मोहाडी उपनगर विभागात पोस्ट मास्तर एस.एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात दोन कर्मचारी कार्यरत असून ते सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या मोहाडी उपनगरात टपाल वाटप करतात. नागरिकांना आमच्या माध्यमातून आप्तांची ख्यालीखुशाली  कळते, नोकरीचा कॉल, आनंदाची बातमी देणारे पत्र असेल ते संबंधितांपर्यंत पोहचवून त्यांना आनंदाची बातमी देण्याच्या या कामात आंतरिक समाधान मिळते, असे सोनवणे यांनी सांगितले. एका वृद्धेचा मुलगा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याने आईला पत्र लिहिले. परंतु तिला पत्र वाचता येत नव्हते. तिला ते पत्र वाचून दाखविले. मुलाची खुशाली कळाल्याने तिच्या चेहºयावर आनंद पसरला. असा अनुभव नित्याचा असल्याने या कामाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे.  सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत गावात टपाल वाटप होते. त्यानंतर कार्यालयात येणाºया नागरिकांना माहिती देणे, मदत करणे अशी कामे सुरू असतात. मनमिळावू स्वभावामुळे आपणास कामात कधी अडचण आली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. वडील एस.टी. महामंडळात कर्मचारी असून आई गृहिणी आहे. त्यांच्यासह दोन बहिणी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.  माझ्या या कामामुळे आई-वडिलांना मदत होते,  असेही ज्योती सोनवणे यांनी सांगितले. काम सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे कोणत्याही कामाची लाज न बाळगता आवड  असलेल्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत रहावे. महिलांना आता सर्व क्षेत्र खुली होत आहेत. त्याचा लाभ उठवून महिलांनी विविध क्षेत्रात पुढे जावे, असा संदेश त्यांनी युवती व महिलांना दिला. 

टॅग्स :Dhuleधुळे