शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींनी स्वच्छता दर्पण स्पर्धेसाठी कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 11:51 IST

गुणांकनासह रॅँकीग ठरणार, गावागावात स्वच्छतेबाबत केली जातेय जनजागृती

ठळक मुद्देस्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धारंगरंगोटी करण्याचे काम ग्रामपंचायतींना करावे लागत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत

आॅनलाइन लोकमतधुळे : राष्टÑीयस्तरावरील स्वच्छता दर्पण स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायती सज्ज झालेल्या आहेत. गावातील सर्व कुटुंबाना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छतागृहिंच्या मदतीने जनजागृती, प्रशिक्षण, व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आदी उपक्रम आहेत. स्पर्धा सर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी कंबर कसलेली आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेतील कामगिरीच्याबाबतीत धुळे जिल्हा राज्यात १२व्या स्थानी असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.या स्पर्धेंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे. स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून, शाश्वत स्वच्छतेसाठी शौचालयांचा वापर, स्वच्छतागृही यांची निवड, प्रशिक्षण, व स्वच्छतागृह सक्रीय करणे या बाबी स्पर्धेसाठी महत्वाच्या असणार आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबाबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम ग्रामपंचायतींना करावे लागत आहे. ‘हगणदारीमुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक, व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयांचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे पाच महत्वाचे संदेश गावात रंगविणे गरजेचे आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या नमुना आकार रंगसंगतीप्रमाणे एक स्वागत फलक व चांर भिंती रंगविणे आवश्यक असणार आहे.अ‍ॅपच्या माध्यमातून हे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहे. या उपक्रमांतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर ग्रामीण जनतेचे प्रबोधन होणार आहे. स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या गावांचा सन्मान होणार आहे.त्यामुळे या स्पर्धेला गती मिळाली असून, गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे