शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात खोदकाम करतांना सापडली चांदीमिश्रीत नाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 17:53 IST

पोलिसांनी ५०० नाणी घेतली ताब्यात, ही नाणी पुरातत्व विभागाकडे देणार

ठळक मुद्देखोदकामात सापडली चांदीमिश्रीत ५०० नाणीनाणी पुरातत्व विभागाकडे जमा करण्याची कार्यवाही सुरूनाणी ब्रिटीशकालीन आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील गल्ली क्रमांक २ मध्ये घराच्या कामासाठी खोदकाम करताना चांदीमिश्रीत ५०० नाणी सापडली आहेत़ सदर नाणी ही धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुरातत्व विभागाकडे ती जमा करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे़ शहरातील गल्ली क्रमांक दोन मधील जैन भवनाजवळ अ‍ॅड़ मनोज अनिलकुमार हेडा यांच्या घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम शुक्रवारी सुरु करण्यात आले़ त्यावेळी मजुरांना एक पत्र्याचा डबा सापडला़ हा डबा पूर्णपणे जीर्णावसस्थेत होता़ यावेळी अ‍ॅड़ हेडा हे घटनास्थळी हजर असल्याने त्यांनी हा डबा ताब्यात घेतला़ यावेळी डब्यामध्ये चांदी मिश्रीत नाणे असल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे हेडा यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना ही माहिती दिली़ सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, उपनिरीक्षक नाना आखाडे, राजेंद्र माळी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नारायण कळसकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, जगदीश खैरनार, मुक्तार मन्सुरी, एखलाख पठाण, विनायक सोनवणे, महेश जाधव, योगेश चव्हाण, राहूल पाटील, दिनेश शिंदे, संजय जाधव, दीपक दामोदर, संदीप पाटील घटनास्थळी पोहचले़ यावेळी घटनास्थळी खात्री केल्यानंतर ही नाणी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आली़ मान्यताप्राप्त सराफास पाचारण करण्यात येऊन या नाण्यांची तपासणी करण्यात आली़ या नाण्यांमध्ये चांदीचा अंश असल्याचे स्पष्ट झाले़  या डब्यात १ लाख २० हजार २२८ रुपये किंमतीचे ५०० नाणी मिळून आली. परिणामी ही नाणी कायदेशीर प्रक्रियेने ताब्यात घेण्यात आली़ यासंदर्भात न्यायालय, जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभागाला पत्र देण्यात आलेले आहे़ या नाण्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे़ ही नाणी ब्रिटीशकालीन असून त्यावर जार्ज पंचम यांचा फोटो आहे़ तसेच वेगवेगळ्या तीन भाषेत एक रुपया असे नमूद केले आहे़ वरिष्ठ अधिकाºयांना याची माहिती दिली आहे़