धुळे : मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी आणि दिवसभर घडणाऱ्या राजकीय घडामोडीकडे जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नजर होते. शपथविधीनंतर भाजपच्या पदाधिकाºयांनी जल्लोष केला. पक्ष कार्यालयात जल्लोषाचे वातावरण होते. पण दुसरीकडे राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.धुळे शहरातील महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर आणि माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या कार्यालयात एकच जल्लोष दिसला. याठिकाणी आतषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात पदाधिकारी आनंदात नाचतांना दिसून आले.दुसरीकडे राष्टÑवादी आणि काँग्रेस भवनात शुकशुकाट दिसून आला. पक्षाचे पदाधिकारी हे दिवसभर कार्यालयाकडे फिरकलेच नाही. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे मुंबईला असल्याने त्यांच्या कार्यालयातही शांतता दिसून आली.शिवसेनेच्या कार्यालयातही प्रमुख पदाधिकारी हे बसून होते. परंतू गर्दी किंवा उत्साह दिसून आला नाही. दिवसभर सर्व पदाधिकारी हे मुंबईत घडणाºया राजकीय घडामोडी चर्चा करतांना दिसून आले.
राष्टÑवादीच्या कार्यालयात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 21:59 IST