लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला रविवारी ‘जय मल्हार’च्या जयघोषात सुरूवात झाली. या यात्रोत्सवाला २६८ वर्षांची परंपरा लाभली आहे. पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी केली होती.९ रोजी सकाळी आमदार काशिराम पावरा यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली़ यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जि़प़अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, पीपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, डीवायएसपी अनिल माने, मार्केट कमिटी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, सुरेश बागुल, नवनीत राखेचा, सेनेचे राजू टेलर, मनोज धनगर, हिंमत महाजन, भरतसिंग राजपूत, एऩडी़ पाटील, हर्षल राजपूत, राजेश सोनवणे, अभिमन भोई, अरूण धोबी, किरण दलाल, गुलाब भोई, साहेबराव महाजन, खंडेराव संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, गोपाल ठाकरे, श्रीहरी यादगिरीवार, गोपाल मारवाडी, महेश लोहार, नितीन गिरासे, आबा धाकड, मंदिर संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवसभर ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शन व यात्रेचा लाभ घेतला. तर रात्री विद्युत रोषणाईत शहरातील नागरिकांनी यात्रेचा आनंद घेतला. यात्रेनिमित्त चौका-चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिराच्या बाजूला २४ तास तात्पुरती पोलिस चौकी उभारण्यात आली आहे.डीवायएसपी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पीएसआय, शिंंदखेडा, नरडाणा, थाळनेर व शिरपूर ठाण्यातील पोलीस कर्मचारी यात्रा परिसरात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय फिरते पथक आहे.मेवाशी मेळावायात्रोत्सवानिमित्त मार्केट आवारात मेवाशी मेळावा भरविण्यात आला आहे़ त्यात राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजराथ, मध्यप्रदेश, कच्छ काठेवाड आदी भागातून घोडे, बैल, म्हैशी, गायी व बकऱ्या-मेंढ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विशेषत उत्तरप्रदेशहून आलेल्या घोड्यांच्या किंंमती जास्त तर गुजराथहून आलेल्या घोड्यांच्या किंंमत कमी असल्याचे घोडे विक्रेत्यांनी सांगितले.यात्रेत ‘सीसीटीव्ही’चा वॉच४खंडेराव बाबा मंदिर संस्थानने मंदिरात ८ तर यात्रा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़ त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी काही घटना घडल्यास त्यावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहेत़४यात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात २४ तास तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.४यात्रोत्सव काळात मंदीर पहाटे ५ वाजता उघडेल तर रात्री ११़३० वाजता बंद केले जाणार आहे़
श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:28 IST