शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून मोदी सरकारचे श्राध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:45 IST

सर्वपित्रीचा मुहुर्त : पेट्रोल, डिझेल, सिलेंडरच्या भाववाढीचा निषेध

ठळक मुद्देशहरातील आग्रा रोडवरुन निघालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आला़जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी मोदी सरकारचे प्रतिकात्मक श्राध्दही घालण्यात आले़मोदी तेरे राज मे दारु सस्ती महेंगा तेल अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रारोड दणाणून सोडला़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापरावयाचे गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढणाºया भाववाढीचा निषेध नोंदवित राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने घोषणाबाजी करण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी मोदी सरकारचे प्रतिकात्मक श्राध्दही घालण्यात आले़ या अनोख्या आंदोलनामुळे धुळेकरांचे लक्ष वेधले गेले़ देश की जनता करे पुकार, नही चाहीये मोदी-फडणवीस सरकाऱ पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणाºया मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी फडणवीस तेरे राज मे जनता हे हाल मे, मोदी तेरे राज मे दारु सस्ती महेंगा तेल अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रारोड दणाणून सोडला़ महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, उपमहापौर उमेर अन्सारी, मोहन नवले, दादा खताळ, भानुदास पारोळेकर, नंदलाल अजळकर, वाल्मिक जाधव, गणेश जाधव, दिलीप भामरे, शिवाजीराव पवार, किशोर चौधरी, नंदू येलमामे, रविंद्र आघाव, संदिप पाकळे, संदिप पाटोळे, गिरीश भामरे, रणजितराजे भोसले, साहेबराव देसाई, अ‍ॅड़ रविंद्र पाटील, शेख इम्रान, सलीम शेख, कुंदन पवार, आऱ बी़ माळी, मुन्ना शितोळे, चंद्रकांत महाजन, महेंद्र शिरसाठ, मयूर कोळी, दिनेश पोतदार, संदिप हजारे, ज्योती पावरा, राधिका ठाकरे, चंद्रकला जाधव, चंद्रकला शिंदे, कल्पना बोरसे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते़़ शहरातील आग्रा रोडवरुन निघालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आला़ याठिकाणी विधीवत पूजन करत मोदी सरकारचे श्राध्दही घालण्यात आले़ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले़ सर्वसामान्यांची कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेलची दरवाढ करुन सरकारने नेमके काय सिध्द केले आहे़ युपीएच्या काळात कच्चा तेलाचे भाव ११० प्रति डॉलर होते़ तरीही पेट्रोलचा दर ६० ते ७० रुपयांदरम्यान होता़ आता तर कच्चा तेलाचे दर ३० ते ४० डॉलरवर पोहचले आहे़ असे असताना पेट्रोल ३० रुपये लिटर मिळण्याऐवजी ८० रुपये मिळत आहे़ एक ते दोन महिन्यात पेट्रोल १६ रुपयांनी तर डिझेल ४ रुपये लिटरमागे वाढविण्यात आले आहे़ तसेच एका सिलेंडरमागे ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे़ त्यामुळे महागाईचा आलेख उंचावत आहे़