शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ३५ स्वस्त रेशनधान्य दुकानदारांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 11:13 IST

पुरवठा विभाग :  गैरप्रकार केल्यास कारवाईचा दिला इशारा 

ठळक मुद्दे३५ दुकानदारांविरूद्ध तक्रारीजिल्हा प्रशासनाने पॉस मशिनचे केले वितरणतीन दुकानदारांना दिल्या होत्या नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील ३५ स्वस्त रेशनधान्य दुकानदारांच्या विरोधात जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत संबंधित स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा विभागाने नोटीसाही बजावल्या होत्या. परंतु, रेशनधान्य दुकानदारांनी त्यांची बाजू प्रशासनाकडे मांडल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने संबंधित स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना यापुढे गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वितरण करताना होणाºया काळाबाजाराला चाप बसावा; याउद्देशाने  जिल्हा प्रशासनाने  पॉस मशीनचे वितरण केले होते.  मात्र,  या मशीनमध्ये जिल्ह्यातील काही दुकानदारांनी गैरप्रकार करून ठेवल्याचे आढळून आले होते. तसेच काही रेशन धान्य दुकानदारांनी अन्नधान्याचा  भरणा मुदतीत केलेला नव्हता, तर काही दुकानदार हे पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करतही नव्हते, तर काहींनी चक्क लाभार्थ्यांचे रेशनकार्डच त्यांच्याकडे ठेऊन घेतले होते. ही बाब लाभार्थ्यांनी  जिल्हा पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून देत संबंधित दुकानदारांच्या विरूद्ध तक्रारही केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शिरपूर १३, धुळे १३ तर साक्री तालुक्यातील ९ दुकानदारांना नोटीसा दिल्या होत्या. शिंदखेडा तालुक्यातील  रेशन धान्य दुकानदारांबाबत                एकही तक्रार प्राप्त नव्हती. त्यामुळे शिंदखेडा तालुका वगळता उर्वरीत जिल्ह्यातील तीन तालुक्यातील दुकानदारांना नोटीसा दिल्या होत्या. डिपॉझिट जप्तीची कारवाई टळलीनोटीसा दिलेल्या ३५  स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना नोटीसा दिल्यानंतर संबंधित दुकानदारांचे डिपॉझिट जप्त करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले होेते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या स्वस्त रेशन धान्य दुकानदारांनी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे यांची भेट घेतली. कारवाई करू नका, अशी विनंती त्यांना केली. यावेळी दुकानदारांनी त्यांना पॉस मशीन हाताळताना येणाºया अडचणींबाबत माहिती दिली. तसेच प्रशासनाने दिलेल्या मुदतीत अन्नधान्याचा भरणा दुकानदार करतील, असे पत्रही प्रशासनाला दिले. त्यामुळे दुकानदारांचे डिपॉझिट जप्तीची कारवाई टळल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानांमध्ये धान्य वितरण करताना गैरप्रकार होऊ नये; म्हणून पॉस मशीनचे वाटप करण्यात आले होते. परंतु, या मशीनमध्ये अजुनही तांत्रिक अडचणी येत असल्याचे दुकानदारांनी जिल्हा पुरवठा विभागला सांगितले आहे.