शासनाने ५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांनुसार ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जारी असलेली संचारबंदी, शॉपिंग मॉल व व्यापारी संकुलातील जीवनावश्यक तसेच वैद्यकीय सेवेशी संलग्न दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरुवारी दुपारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. निर्बंध असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बारपत्थर, आग्रा रोड, गल्ली नंबर ४, ऊसगल्ली आदी भागात पथकाने फिरून दुकाने बंद केले. शुक्रवारी सकाळ ही मोहीम सुरू झाली. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु केली. पथकाने झाशी राणी चौकात राधाकृष्णन शॉपिंग काॅम्प्लेक्समधील दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याच चौकातील एका रेस्टॉरंटवर दंडात्मक कारवाई केली. गर्दी जमा झाल्याने त्यांना हटविण्यात आले. यात पुन्हा जे विनामास्क आढळून आले त्यांना पकडून त्यांच्याकडून मनपा पथकाने दंड वसूल केला. या कारवाईमुळे आग्रा रोडसह बारा पत्थर, गल्ली नंबर ४, साक्री रोड यासह विविध भागातील दुकाने बंद झाली होती. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल सुरू होते.
मिनी लॅाकडाऊनमध्ये पाचव्या दिवशी दुकानांचे शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST