शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी व्यक्त केला चीनचा निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:13 IST

चीनी वस्तूंची खरेदी बंद करण्याचा नारा : व्यापारी, नागरिक, युवकांनी नोंदविला ‘निषेध फेरी’त सहभाग

ठळक मुद्देया निषेध फेरीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. जुना आग्रारोडवरून ही निषेध फेरी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत आली. यावेळी सहभागी शिवसैनिक, व्यापारी व तरुणांनी चीनच्या विरोधात घोषणाबाजी करत येथील परिसर दणाणून सोडला. यावेळी ‘चीनच्या वस्तू घेऊ नका’, भारतीय असलयाचा अभिमान बाळगा’, भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य चोर पद्धतीने पार पाडू या, अन् चीनला धडा शिकवूया’, असे आवाहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :    चीनच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात मंगळवारी सकाळी शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. या निषेध फेरीद्वारे शिवसैनिकांनी चीनी वस्तूंची खरेदी बंद करा, असे आवाहन धुळेकरांना करीत चीनचा निषेध नोंदविला. या निषेध फेरीत शहरातील व्यापारी मंडळी, नागरिक व युवकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत चीनच्या विरोधात घोषणाबाजी  केली. शिवसेनेने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भारत आणि चीन यांच्यात डोकलाम सीमेवरून वाद सुरू आहे. त्यात चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे भारतीय सैनिकांना सीमारेषेवर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जीवाची पर्वा न करता आपले सैनिक २४ तास देशाची सेवा करत आहे. अशा परिस्थितीत चीनी सैनिक अहंकारीपणे भारतीय सैनिकांसोबत वाद घालत आहेत. याच चीनच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी ही निषेध फेरी काढण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, लोकसभा संघटक महेश मिस्तरी, महानगरप्रमुख सतीश महाले,  डॉ. माधुरी बाफना, गंगाधर माळी, संजय गुजराथी, सुनील बैसाणे, अ‍ॅड. पंकज गोरे, भूपेंद्र लहामगे, नरेंद्र अहिरे, रवींद्र काकड,  किरण जोंधळे, प्रफुल्ल पाटील, राम कानकाटे भगवान गवळी, संदीप सूर्यवंशी, भगवान करनकाळ,  आदी उपस्थित होते. 

चीनच्या आर्थिक मुसक्या आवळणे गरजेचे! 

आशिया खंडात भारतातील एकमेव अशी बाजारपेठ आहे. जिथे चीनची आर्थिक स्थिती अधिक बळकट होत आहे. चीनी वस्तू मोठ्या प्रमाणावर भारतात विकल्या जातात. अशा परिस्थितीत चीन भारतीय सैनिकांच्या जीवावर उठत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत चीनच्या आर्थिक मुसक्या आवळणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.