लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरातील श्रीसंघातर्फे रविवारी मालेगाव येथील दिक्षार्थी जैनम बोरा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दुपारी शोभायात्रा काढण्यात आली़मालेगाव येथील व्यापारी जितेंद्र बोरा व जयश्री बोरा यांचा एकुलता एक मुलगा जैनम बोरा (१७) हा ३० एप्रिल रोजी मालेगाव शहरात समरथ गच्छाधिपती प.पू. उत्तमचंद गुरु महाराजांच्या सानिध्यात जैन दिक्षा ग्रहण करणार आहे. श्रीसंघातर्फे तथा चोरडिया परिवारातर्फे दिक्षार्थी जैनम बोरा यांचा स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार झाला़ यावेळी संघपती सुवालाल ललवानी, नवनीत राखेचा, विजय चोरडीया, नरेश चोरडीया, डॉ़संजय सुराणा, रमेशचंद्र बागरेचा, विजय बाफणा, नरेंद्र ललवानी, प्रमोद बेदमुथा, महेंद्र कांकरीया, राकेश संकलेचा, संदीप मुणोत, निखिल सांडेचा, सचिन दुग्गड, विशाल बागरेचा, सचिन बागरेचा, उमेश लोढा, राजू पारख, भिकचंद दुग्गड, राजेंद्र डागा, महावीर बाफणा, जयेश ललवानी, तुषार दुग्गड, दीपक डागा, नवनीत चोरडिया, कल्पेश गेलडा, डॉ़पंकज जैन, महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली संजय सुराणा, निमाबाई ललवाणी, शोभा बाफणा, सुजाता चोरडिया, शोभा ओस्तवाल आदी उपस्थित होते़
शिरपूर श्रीसंघातर्फे दिक्षार्थी जैनम बोरा यांची शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:55 IST