शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा तालुक्याला आतापर्यंत एकदाच अध्यक्षपदाचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:02 IST

आतापर्यंत अध्यक्षपदावर शिरपूर, साक्रीचे राहिले आहे वर्चस्व

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या गेल्या ५८ वर्षाच्या कालावधीत २९ जणांनी अध्यक्षपद भूषविले आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनानंतर अध्यक्षपदाचा सर्वात जास्त बहुमान शिरपूर व साक्री, धुळे तालुक्याला मिळाला आहे. तर शिंदखेडा तालुक्याला आतापर्यंत केवळ एकदाच अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, तसेच कोणत्या तालुक्याला पुन्हा संधी मिळते याची जिल्ह्याला उत्सुकता लागलेली आहे.धुळे जिल्हा परिषदेची स्थापना मे १९६२ मध्ये झालेली आहे. नंदुरबार जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी धुळे जिल्हा एकच होता. सुरवातीच्या काळात अध्यक्षपदाचे वर्चस्व नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर या तालुक्याकडेच असायचे. मात्र जुलै १९९८ मध्ये नंदुरबार जिल्हा अस्तित्वात येत धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले.विभाजनानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचा बहुमान हा सर्वात जास्त शिरपूर, साक्री या दोन तालुक्यांना मिळाला आहे. त्याखालोखाल धुळे तालुक्याच्या वाटेला हे पद आलेले आहे. मात्र शिंदखेडा तालुक्याला गेल्या २२ वर्षात केवळ एकदाच अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेला आहे.नंदुरबार जिल्हा असतांना शिरपूरचे व्यंकटराव तानाजी रणधीर यांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर कलाबाई युवराज भील, सरलाबाई प्रल्हाद पाटील यांनीही अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच साक्री तालुक्यातील लतिका ज्ञानेश्वर नागरे, तर शिवाजीराव नामदेव दहिते यांनी तीनवेळा अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय धुळे तालुक्यातून सुभाष शिवाजीराव देवरे, मनोहर दत्तात्रय भदाणे, सुधीर सुधाकर जाधव, यांनी अध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळलेले आहे. तर शिंदखेडा तालुक्याच्या संगीता राजेंद्र देसले या एकमेव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत. आताही १० पैकी ८ जागा भाजपने जिंकल्या असल्या तरी या तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणे जवळपास कठीणच आहे. दरम्यान आता जिल्हा परिषदेचा ३० व्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. अध्यक्षाची निवड १७ रोजी होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे