शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा पोलिसांकडून ४ गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:42 IST

यशस्वी कामगिरी : फरार आरोपींसाठी विशेष पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली होती़ त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या नेतृत्वाखालील शिंदखेडा पोलिसांच्या पथकाने विविध ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत़ दरम्यान, विविध प्रकरणातील फरार आरोपींचा शोध मात्र सुरु आहे़ झुलेलाल मंदिर चोरी, एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा, निवडणूक काळात मतदान जनजागृतीच्या एलसीडी चोरीस गेला होता त्याचा देखील छडा लावण्यात आला आहे़ शिवाय पाटण येथील आशापुरी देवी मंदिराच्या निवासस्थानातून भक्तांचे चोरीस गेलेले मोबाईल देखील हस्तगत करण्यात आलेले आहे़ या गुन्ह्यात पवन कोमलसिंग गिरासे, रमेश उर्फ राहुल सुनील मराठे, रियाज उर्फ राजा रफिक शेख (सर्व रा़ शिंदखेडा) यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली़ त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून चोरलेला माल काढून दिला आहे़ याच गुन्ह्यातील अल्केश उर्फ भटू सुरेश माळी, राहुल गोपाळ पाटील आणि अजय (पूर्ण नाव माहित नाही) हे अद्याप फरार आहेत़ त्यांच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून त्यांच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येईल़ त्यांच्याकडून शिंदखेडा शहरातील बरेच चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़ सदर आरोपी हे सराईत असल्याने पोलिसांना गुंगारा देवून फरार होण्यात तरबेज आहेत़ राहुल गोपाळ पाटील याने शिंदखेडा शहरात अ‍ॅक्वा रिदम पाणी वॉटर वाल्यास पिस्तोल लावून धमकावले असून त्याच्या मागावर विशेष पथक नेमण्यात आले आहे़ त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास शिंदखेडा पोलिसांना आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शिरपूर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, महिला पोलीस उपनिरीक्षक गितांजली सानप, पोलीस उपनिरीक्षक एस़ एच़ सैय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे, रफिक मुल्ला, पोलीस कर्मचारी प्रविण निंबाळे, संजय सैंदाणे, एकलाख पठाण, बिपीन पाटील, आबा भील, मयूर थोरात, हर्षल चौधरी, ललित काळे, कपिल लिंगायत, प्रशांत पवार यांनी ही कारवाई केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी