शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील ७८ कामगारांची निवाऱ्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:09 IST

संडे अँकर । आरोग्य तपासणीसह राहण्याची व जेवणाची व्यवस्था ; निवाºयातील सर्वच कोरोना मुक्त

धुळे : मनपामार्फत कोरोना सदृश परिस्थितीत लॉकडाऊन कालावधीत शहरात व शहर हद्दीत दाखल झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत मजूर तसेच कामगार व नागरीकांची तात्पुरती निवाराची व्यवस्था अग्रवाल विश्राम भवन येथे २० मार्चपासून करण्यात आलेली आहे.या निवारा केंद्रात ७८ मजूर तथा नागरीक सद्यस्थितीत ठेवण्यात आलेले आहे. यात केरळ येथील ५६, उत्तर प्रदेश १४, मध्य प्रदेश २, पश्चिम बंगाल १ व महाराष्ट्रातील इतर भागातील ५ असे एकूण ७८ नागरीक तथा मजूर दाखल आहेत. सदर व्यकतींची मनपाच्या आरोग्य विभागामार्फत दररोज सकाळ व संध्याकाळ आरोग्य तपासणी केली जात़ या निवाºयातील एकही व्यकती कोरोना बाधीत नाही. दाखल नागरीकांना दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था सद्यस्थितीत मनपामार्फत करण्यात येत आहे. तसेच शहरातील अन्य सेवाभावी संस्थाकडून चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात राजेंद्र इंगळे यांच्या सहकार्य मिळत आहे. सदर निवारागृहातील ७८ व्यक्ती गोळीबार टेकडी येथे असलेल्या पश्चिम बंगालमधील १० व्यकती, पोलीस व इतर सहकारी कर्मचारी अशा सर्वांना मनपा मार्फत सकाळ व संध्याकाळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार बचत गटांनी त्यांच्या मार्फत संबंधित नागरीकांना टुथ पेस्ट, ब्रश, साबण व मास्क यांचा पुरवठा केलेला आहे. आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गणेश गिरी, अभियंता कैलास शिंदे कार्यवाही करीत आहे़ तर मनपा प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, राजेश गायकवाड परिश्रम घेत आहे़ तर आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे