शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक संघटनेतर्फे शाहीरी जलसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:38 IST

शिरपूर : बालकलाकारांनी सादर केले प्रबोधनात्मक नृत्य

 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरात भारतरत्न डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक जनआंदोलनातर्फे शाहीरी जलसा व प्रबोधनात्मक नृत्यकलेचा कार्यक्रम घेण्यात आला़१३ रोजी संध्याकाळी येथील खालचे गावात शाहीरी जलसाचा कार्यक्रम पार पडला़ सुरूवातीला डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ यावेळी नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी अमोल बागुल, सिद्धार्थ जगदेव (धुळे), सत्यशोधक जनआंदोलनचे जिल्हाध्यक्ष दत्तू थोरात, नगरसेवक पिंटू शिरसाठ, गणेश सावळे, बापू थोरात, महेंद्रसिंग परदेशी, गोपाल पाटील, बापू इंदासे, बापू सोनवणे, श्रीराम सोनवणे, किसन वडार, संजीव थोरात, ब्रिजेश थोरात,  पी.वाय. शिरसाठ, बी.व्ही. मोरे, जी.के. मंगळे, अनिल आखाडे, जिजाबराव कुवर,  बाबू खैरनार, राजू खैरनार आदी उपस्थित होते़सत्यशोधक जनआंदोलन आयोजित ‘जागर-२०१९’ निमित्ताने कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांची  संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली. शाहीरी जलसाचे सादरीकरण विजय अहिरे यांनी ‘संविधान बोल रहा है, मैं खतरे में हुँ’ या शायरीने केले. शाहीर प्रवीण पाटील, शाहीर मनोज  नगराळे, विजय वाघ, सिद्धांत बागुल, राकेश अहिरे, राहुल बच्छाव व क्रांती पानपाटील यांनी शाहिरी जलसाचे सादरीकरण केले़ सत्यशोधक शिक्षक सभेतर्फे वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, प्रबोधनपर सामान्यज्ञान स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  वक्तृत्व स्पर्धेत- प्रथम गौरी भटू थोरात,  द्वितीय  मयुरी महेंद्र करंकाळ, तृतीय क्रमांक प्रिया रमेश संैदाणे, सामान्यज्ञान प्रबोधन परीक्षा- मयुरी महिंद्र करंकाळ,  सिद्धार्थ सुनील थोरात, अभिजित रवींद्र वाघ तर मोठ्या गटात- साक्षी नाना बैसाने, कविता राजू थोरात, कुणाल अशोक सोनवणे, रंगभरण स्पर्धेत-  देवयानी रमेश शिरसाठ,  स्वाती यशवंत सावळे, संजना अशोक खैरनार, रांगोळी स्पर्धेत- दिपाली संजय थोरात,  दीक्षा अनिल खैरनार, पुनम अरुण बाविस्कर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.शाहीरी जलसा कार्यक्रमात  राजमाता जिजाऊंची वेशभूषा तुलसी गोपाल कापडे, सावित्रीबाई फुलेंची निकिता सुनील पाटील, रमाई आंबेडकरांची वेशभूषा योगाक्षी राहुलसिंग परदेशी या विद्यार्थिनींनी केली. शाहिरी जलसा व समुहनृत्याचे सुत्रसंचालन राजीव हाके व ज्वाला मोरे यांनी केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यशोधक शिक्षक संघटनेचे सुनील बैसाणे, योगेश पवार, राहुल थोरात, सतिष खैरनार, देवानंद थोरात, सुनील थोरात, दिपक अहिरे, महेंद्र करंकाळ, रावसाहेब अहिरे, कचरू अहिरे, अनिल थोरात, राजेश सावळे, आकाश सोनार, दिपक खैरनार, अनिल खैरनार, दादा पाटोळे, श्रावण पाटोळे, बाळा पवार, गौतम अहिरे, शुभम मोरे, संदिप वानखेडे यांनी परिश्रम घेतले़ यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे