शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

३० खाजगी डॉक्टर देणार सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:31 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव : दोंडाईच्यात आय.एम.आय. व आयुष संघटना सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे संख्याबळ कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या आवाहनानुसार दोंडाईचा शहरातील किमान ३० खाजगी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणार आहेत.दोंडाईचा व परिसरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. दोंडाईच्यात ५० दिवसात कोरोना बाधितांची संख्या ९१ झाली आहे. अजून सुमारे १०० जणांचे स्वॅब अहवाल येणे बाकी असल्याने रुग्ण संख्या वाढणार आहे. बहुतांश नागरिक अजूनही मास्क वापरत नाहीत, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत, नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत, यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.उपजिल्हा रुग्णालयात फक्त ५ वैद्यकीय अधिकारी आहेत. परिचारिका, वार्डबॉय कमी आहेत. जेमतेम दोन सफाई कामगार आहेत. ५ डॉक्टरांना स्वॅब घेणे, उपचार करणे, रुग्ण आढळल्यावर ट्रेसिंग करणे, आॅक्सिजन सिलेंडर लावणे, रिपोर्ट करणे आदी कामे करावी लागतात. त्यातच कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. कोरोना रुग्ण व अन्य रुग्ण यांना सेवा देण्यास ५ डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज दोंडाईचा नगरपालिकेत अपर तहसीलदार सुदाम महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल नरोटे, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी दोंडाईच्यातील खाजगी वैद्यकीय सेवा देणाºया डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती.दोंडाईचातील खाजगी वैद्यकीय सेवा देणाºया डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढत असल्याने सेवा द्यावी, असे आवाहन अपर तहसीलदार सुदाम महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र देशमुख, डॉ.प्रफुल्ल दुग्गड यांनी केले.बैठकीला तहसीलदार सुदाम महाजन, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, बांधकाम अभियंता जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, शिंदखेडा कोविड सेंटरचे डॉ.हितेंद्र देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल नरोटे, डॉ.सचिन पारख, डॉ.प्रफुल्ल दुग्गड, प्रशासनाच्यावतीने उपस्थित होते. तर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये आय.एम.आय.चे अध्यक्ष डॉ.हेमंत नागरे, आयुष संघटनेचे अध्यक्ष डॉ.जितीन अग्रवाल, डॉ.अनिल धनगर, डॉ.सुधीर साठे, डॉ.चेतन बच्छाव, डॉ.जयेश ठाकूर, डॉ.विशाल भामरे, डॉ.संदीप भावसार, डॉ.कुणाल थोरात, डॉ.दीपक परमार, डॉ.भूषण चौधरी, डॉ.भूषण वाडीले आदी उपस्थित होते.कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दोंडाईच्यातील आय.एम.आय. व आयुष संघटनेचा सर्व डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास होकार दिला आहे. खाजगी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी व कोरोना सेंटरला दररोज मदत करणार आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयास मोठा हातभार लागणार आहे.