शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

२८ वर्ष सेवा देणा-या जवानाचा सेवापूर्ती गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:03 IST

संविधान दिन व शहिदांना आदरांजली : संविधान प्रास्ताविकेचे मोफत वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : भारतीय सैन्य दलात २८ वर्ष सेवा केलेल्या सोमनाथ चौधरी या जवानाचा वाकी ग्रामस्थ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सेवापूर्ती नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डी.एस. अहिरे होते. २६/११ च्या पार्श्वभूमीवर व संविधान दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार बापू चौरे, धनराज जैैन, वाणी समाजे अध्यक्ष जयवंत बागड, डॉ.जितेश चौरे, पं.स. सभापती गणपत चौरे, अ.भा. जैन युवा संघटनेचे अध्यक्ष रिखबचंद जैन, कुडाशीच्या माजी सरपंच रिना भोये, अंनिस अध्यक्ष सुभाष जगताप, जयाबाई खांडवी, गणु साबळे, देविदास चौधरी, एस.के. गायकवाड, कलाबाई सोमनाथ चौधरी, लुकडू चौधरी, मिलाबाई चौधरी, लक्ष्मण गायकवाड, भारुडे, डॉ.प्रकाश गायकवाड, प्रा.डी.टी. पाटील, प्रा.विशाल गांगुर्डे, अंबादास बेनुस्कर आदी उपस्थित होते.गावाच्या सीमेवरील हनुमान मंदिरापासून ट्रॅक्टर रथावरुन त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.  कार्यक्रमास्थळी मान्यवरांनी जवान सोमनाथ, त्यांच्या पत्नी कलाबाई व त्यांच्या आई मिलाबाई व वडील लुकडू चौधरी यांचा शाल, श्रीफळ, साडी व कपडे देऊन नागरी सत्कार केला.  तर पिंपळनेर अंनिसचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष रिखब जैन, डॉ.जितेश चौरे, प्रधान सचिव विशाल गांगुर्डे यांनीही जवानाचा सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी खासदार बापू चौरे म्हणाले, सिमेवर निस्पृह सेवा बजावत सोमनाथने देशसेवेबरोबर आपल्या गावाशी, कुटूंबाशी नाळ तोडली नाही. धर्मपत्नी कलाबाईने या जवानाच्या देश सेवेला साथ दिली. सोमनाथ २८ वर्ष सेवा करुन आज आपल्या गावी सुखरुप आल्याने सर्व गावाला आनंद झाला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डी.एस. अहिरे यांनी या जवानाच्या कार्याला सलाम करत चौधरी कुटूंबाने एक मुलगा देश सेवेला दिला. २८ वर्ष प्रदीर्घ खडतर प्रवासातून सुखरुप परत आल्याने आम्हा गावकºयांना अतिशय आनंद झाला असून त्यांनी आता सेवानिवृत्ती नंतर समाजकार्यात प्रवृत्त व्हाव, अशी अपेक्षा व्यक्त केली.  आभार जवानाचे लहानबंधू साहेबराव चौधरी यांनी मानले.आ.मा. पाटील महाविद्यालय पिंपळनेर- येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासो एन.के. पाटील विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी. सोनवणे होते. संविधान हा जीवन जगण्याचा अमुल्य ग्रंथ आहे. राष्ट्राची उन्नती करावयाची असेल तर सर्वांनी संविधानाचा आदर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. मस्के यांनी केले. प्राचार्य डॉ. एस.टी. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.डॉ.राम पेटारे यांनी केले. आभार प्रा.एम.बी.एखंडे यांनी मानलेत.कलमाडी विद्यालय- शिंदखेडा तालुकयातील कलमाडी येथील अगस्तमुनी विद्यालयात संविधान दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.ए. कदम, प्रमुख पाहुणे जे.डी. पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुंबई घटनेतील शहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर सामुहिक संविधान वाचन करण्यात आले. तंबाखुमुक्त अभियानाबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक एस.ए. कदम यांचा सत्कार करण्यात आला.राजीव गांधी विद्यालय गोताणे- येथील राजीव गांधी विद्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस.व्ही. देसले होते. यावेळी सामुहिक संविधान वाचन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.झेड.बी.पाटील महाविद्यालय- जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड.बी.पाटील महाविद्यालयात रासेयो व सामाजिक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमाता प्राचार्य डॉ. पी.एच. पवार यांच्याहस्ते संविधान पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालिका डॉ. निलिमा पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.ए.पाटील, डॉ. विद्या पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. एस.ए.मोरे यांनी केले.  यावेळी सर्वांनी देशाच्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे मूल्य जपण्याची शपथ घेतली.

टॅग्स :Dhuleधुळे