दोंडाईचा नगरपालिकेच्या सभागृहात महसूल आणि कृषी विभागच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली, त्यात वरील सूचना देण्यात आल्या. या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार सुदाम महाजन, नायब तहसीलदार वाडीले, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, मंडळ कृषी अधिकारी एम.एम. बोरसे, तलाठी गोसावी, कृषी विभागांचे विविध भागाचे मंडळ कृषी अधिकारी, यांच्यासह बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, शेतकरी प्रकाश पाटील, जि.प. सदस्य पंकज कदम, नथ्थू वारूळे, मोतीलाल वाकडे, शांतीलाल पटेल, ईश्वर उखा पाटील, नरेंद्र जैन, जगन्नाथ राजपूत, भगवान पाटील, जगदीश नेरकर, नानाभाऊ पवार, योगराज पवार, निंबा जाधव,तुकाराम पवार, दिलीप पाटील, भीमराव बोरसे, भटू आकलाडे, रजेसिंग गिरासे, शशिकांत भदाणे, आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी पढावद येथील शेतकरी ॲड. प्रकाश पाटील यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या वादात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत असल्याचीदेखील तक्रार केली. याशिवाय यावर्षी शिंदखेडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कुठेही मूग, उडदाची पीक शिल्लक राहिलेले नाही, उत्पन्नच नसल्याने मुगाचे उत्पन्न काहीही आलेले नाही परंतु शासनाच्या आकडेवारीत वेगळेच आकडे येतील त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास अडचण होईल.
यावर आ. जयकुमार रावल म्हणाले की, धुळे जिल्हा अवर्षणग्रस्त असल्यावर पात्र असताना देखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही, यावर्षी पावसाचा मोठा खंड पडला आहे, त्यामुळे अल्पकालीन पिकांची कापणी प्रयोगाच आकडेवारी ही शून्य यायला हवी अर्थात तीच वस्तुस्थिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळणेसाठी त्याचा लाभ होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुचविलेल्या सर्वच उपाययोजनावर दोन्ही विभागांनी काम करावे.