शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 22:31 IST

महापालिका : भाजीपाला, फळविके्रत्यांना भरला दम

धुळे : देवपुरातील नकाणे रोडवरील स्टेट बँक कॉलनी भागात रस्त्यावर उभ्या राहणाºया भाजीपाला, फळ विक्रेत्यांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने हटविले, जेसीबीची मदत घेऊन त्यांनी केलेले अतिक्रमणही काढत पुन्हा न करण्याचा दमही भरला़ दरम्यान, याच भागात दुसऱ्यांदा ही मोहीम राबविण्यात आलेली आहे़गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे़ दोन दिवसांपुर्वीच शहरातील वडजाई रोड परिसरात अतिक्रमण निर्मुुलन पथकाने काही व्यावसायिक आणि काही निवासी अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ कोणाचाही मुलाईजा न बाळगता अतिक्रमण काढण्यात आले़ तणावपुर्ण वातावरण असलेतरी सध्या या भागात शांतता आहे़देवपुरातील नकाणे रोडवरील स्टेट बँक कॉलनी परिसरात विनोद मोराणकर यांच्या घरालगत वर्दळीच्या रस्त्यावर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करुन रस्ता मोठ्या प्रमाणावर अडविला होता़ गेल्या १५ दिवसांपुर्वीच अचानक याच भागात अतिक्रमण निर्मुलन विभागाने आपली नजर वळवून रस्त्यावरील अतिक्रमण काढून पुन्हा न करण्याची तंबी दिली होती़ मात्र या विभागाची पाठ फिरताच पुन्हा त्याच ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांनी आपले बस्तान बिनधास्तपणे मांडले़ परिणामी रस्ता निमुळता होत गेला होता़ ही बाब पथकाने हेरली आणि अचानक गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जेसीबी मशिन आणून अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला़ तसेच पुन्हा अतिक्रमण न करण्याचा दमही भरला़ पथकाला पाहताच अनेकांनी आपल्या लोटगाड्या तिथून हलविणे पसंत केले़ यावेळी एकच धावपळ उडाली होती़मालेगाव रोडवरही कारवाईशहरातील मालेगाव रोडवर रेल्वे क्रॉसिंगच्या पुढील भागात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने आपला मोर्चा वळविला़ याठिकाणी विनापरवानगी उभारण्यात आलेली कमान जेसीबीच्यावतीने तोडण्यात आली़ शिवाय याच परिसरात होत असलेले अतिक्रमण देखील काढण्यात आले़ कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

टॅग्स :Dhuleधुळे