शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा तालुक्यात आघाडीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 11:40 IST

भाजपतर्फे उमेदवाराचे नाव निश्चित असले तरी शिवसेनेकडूनही अनेकजण इच्छूक

भिका पाटील।आॅनलाइन लोकमतशिंदखेडा : विधानसभा निवणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालेली आहे. भाजपतर्फे उमेदवार निश्चित असला तरी शिवसेनेकडूनही अनेकजण इच्छुक असल्याने चुरस निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आघाडीतर्फे उमेदवार कोण? याची उत्सुकता तालुक्यातील मतदारांना लागून राहिलेली आहे.गेल्या काही वर्षांपासून या मतदार संघावर भाजपाने घट्ट पकड बसविली आहे. या मतदारसंघातून यापूर्वी कॉँग्रेस, शिवसेना, अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे. मात्र २००९ पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदार संघातून भाजपच्या उमेदवाराला कॉँग्रेसच्या उमेदवारापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. असे असले तरी कॉँग्रेस पक्षानेही या मतदारसंघात निवडणुकीच्यादृष्टीने जोरदार तयारी करण्यास सुरूवात केलेली आहे. भाजपतर्फे उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. प्रश्न आहे तो आघाडीचा. गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होेते. मात्र या निवडणुकीत आघाडी आणि युती होणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपकडे हा मतदारसंघ असला तरी शिवसेनेचे काहीजण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे जागेचा तिढा निर्माण होणार नाही ना? याकडेही लक्ष लागून आहे. तर आघाडीतील कॉँग्रेस-राष्टÑवादी या पक्षांपैकी कोणाला ही जागा सुटते, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण १९९० व १९९५ मध्ये या मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. राष्टÑवादीने या मतदारसंघातून गेल्यावेळी निवडणूक लढवली असली तरी या पक्षाला अद्याप विजय मिळालेला नाही. त्यामुळे यावेळी राष्टÑवादीकडे ही जागा जाणार का, यावरही खलबते सुरू आहेत. कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यातून कोणाच्या पारड्यात उमेदवारी पडते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेची निवडणुक चुरशीची होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी आतापासून सुरू केलेली आहे. निवडणुकीत यावेळी कोणाला कौल देतात, याची उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे