शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयातील सात शाळांमध्ये विज्ञान केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:11 IST

विज्ञान शिक्षकांचे १८ रोजी एकदिवसीय प्रशिक्षण

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये  गणित, विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्नसात शाळांना विज्ञान साहित्याचा पुरवठाविज्ञान शिक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण

आॅनलाइन लोकमतधुळे :विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील  कला गुणांना वाव मिळावा,  त्यांना विज्ञान, गणित या विषयांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सात शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. विद्यार्थ्यांचा कल विज्ञानाकडे अधिक आहे. विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनाही संधी मिळावी म्हणून राज्यातील गट/ शहर साधन केंद्रामार्फत स्वानिक स्वराज्य संस्थेच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असल्याचे महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेच्या पत्रात नमूद केले आहे.  या केंद्राला लागणारे साहित्य पुरवठादार म्हणून सारथी इंडस्ट्रीज, पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.या शाळांमध्ये सुरू होणार विज्ञान केंद्रजिल्ह्यात जि.प.शाळा निकुंभे, जि.प.शाळा वाघापूर, जि.प.शाळा मांडळ उर्दू शाळा साक्री, महानगरपालिकेची शाळा क्रमांक ५३, शिंदखेडा येथील न.प.उर्दू शाळा क्रमांक २ व शिरपूर येथील न.प.शाळा क्रमांक ५ या शाळांचा समावेश आहे.ज्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे, त्या शाळांमध्ये विज्ञान विषय हाताळणारे शिक्षक, गट/शहर साधन केंद्रांतर्गत कार्यरत विज्ञान विषय साधन व्यक्ती, संबंधित कर्मचारी यांना नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील साहित्याद्वारे शिकविणे, साहित्याची हाताळणी तसेच साहित्याच्या उपयोगितेबाबत १८ जून रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. साहित्य पुरवठा करणारेच हे प्रशिक्षण देतील. निवड झालेल्या जिल्ह्यातील सातही शाळांना पुरवठादारामार्फत विज्ञान साहित्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेscienceविज्ञान