शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

विज्ञान शाखा अव्वल, कला शाखेचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:10 IST

बारावीचा निकाल : जिल्ह्याचा एकूण निकाल ८३.५२ टक्के, खान्देशात धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी

धुळे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल अव्वल असून कला शाखेचा टक्का घसरला आहे. परीक्षा मंडळातर्फे २१ फेबु्रवारी ते २० मार्च १९ या कालावधीत ४४ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील २०० महाविद्यालयातील २४ हजार २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार १९३ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८३.५२ एवढी आहे.खान्देशात धुळे जिल्हा तळाशीगेल्यावर्षी धुळे जिल्हा नाशिक विभागात अव्वल होता. मात्र यावर्षी खान्देशात सर्वात कमी निकाल धुळे जिल्हाचा लागलेला आहे. निकालात जळगाव ८६.६१, नंदुरबार ८३.८२ व धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला आहे. शाखानिहाय निकाल असाजिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९३.७४ वाणिज्य शाखेचा ८५.७० कला शाखेचा ७०.९४ तर किमान कौशल्याचा निकाल ६४.७४ टक्के लागला.                                                        *विज्ञान शाखाजिल्ह्यातून  विज्ञान  शाखेच्या  १२ हजार ५५३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११ हजार ७६७ विद्यार्थी पास झाले. यात डिस्टींक्शन ९७७ जणांना मिळाले.  प्रथम श्रेणीत ५ हजार ५४८, द्वितीय श्रेणीत ५ हजार ५४ तर तृतीय श्रेणीत १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९३.७४ टक्के लागला.                                                       *कला शाखाकला शाखेच्या ९ हजार १३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  ९ हजार ११६  विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ६ हजार४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात २१९ विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन, प्रथम श्रेणीत २ हजार ५९३, द्वितीय श्रेणीत  ३ हजार ४९२  तर १६३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी७०.९४  एवढी

                                                 *वाणिज्य शाखा

वाणिज्य शाखेसाठी १ हजार ६११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ६०८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १,३७८

                                                     *विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १९५ विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन, ५८३ विद्यार्थी प्रथम,  ५५७ विद्यार्थी द्वितीय तर ४३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८५.७० एवढी आहे.

                                                      *किमान कौशल्यकिमान कौशल्यासाठी ९२६ पैकी ९१६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात डिस्टींक्शन १५ विद्यार्थ्यांना मिळाले. *प्रथम श्रेणीत २३८ द्वितीय श्रेणीत ३३९ तर १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला.  निकालाची टक्केवारी ६४.७४ एवढी आहे.

                                                                *मुली आघाडीवरजिल्हयात २४ हजार १९३ पैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८३.५२ टक्के एवढी आहे. तर ९ हजार ८७४ पैकी ८ हजार ६३६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांची टक्केवारी ८७.४६  टक्के आहे.

*महाविद्यालयातून प्रथम  आलेले विद्यार्थी व कंसात त्यांना मिळालेले गुण असे-

*झेड.बी.पाटील महाविद्यालयझेड.बी.पाटील महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.५८ टक्के लागला. यात दिव्या कुंदन जाधव हिने ९० टक्के गुण मिळविले. तर भाविका मनोज जैन हिने ८९.७७ व आदित्य उपेंद्र आर्थेकर याने ८८ टक्के गुण मिळविले. विज्ञान शाखेपेक्षा वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली. यात त्रृषिकेश नरेश संगतानी याने ९३.८४ टक्के मिळवित महाविद्यालयात प्रथम आला. तर श्रावणी दिलीप पाटील हिने ९३.२३, गौतमी जितेंद्र कुळकर्णी हिने ९२.७६, प्रांजल संजय भावसार ९२.७६, उमेश मनोज रोहिरा ९२.६१, साक्षी महेश बाफना ९२.१५, भाग्यश्री दिनेश चंद्रात्रे ९२, पूनम गलानी ९१.६९, महिमा महेंद्र बडगुजर ९१.३८, जयदीप रविंद्र पाटील ९१.२३, अंकुशा अतुल जैन ९१.२३, एकता अटलानी ९१.०७, क्रिष्णकांत फाफट ९०.४६ व क्रिष्णा सचिन माहेश्वरी याने ९०.३० टक्के गुण मिळवित यश मिळविले आहे.  यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात येत आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे