शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देणार प्रगत शाळांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 15:36 IST

 जिल्ह्यातील ६९९0 सदस्यांचे  २ व ३ नोव्हेंबर रोजी भेटी देण्याचे नियोजन

ठळक मुद्देशाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रगत शाळेची कार्यपद्धती समजून घेणारडिजीटल शाळा, लोकसहभागाबाबत मुख्याध्यापक मार्गदर्शन करतीलइतर सदस्यांनीही प्रेरणा घ्यावी हाच प्रमुख उद्देश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे आता केंद्रांतर्गत असलेल्या डिजीटल, प्रगत शाळांना भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रेरणा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील ६९९० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य  २ व ३ नोव्हेंबर रोजी प्रगत शाळांना भेटी देतील. या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट) व प्राथमिक शिक्षण विभाग जि.प.धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना १०० टक्के मुले शिकत असणाºया प्रगत शाळा, शाळा सिद्धीअंतर्गत ‘ए’ग्रेड शाळा, डिजीटल शाळा, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे आदर्श पटाच्या शाळा, जास्त पटाच्या समृद्ध शाळा, तसेच ज्या शाळेसाठी समाजाने मोठ्या स्वरूपात निधी, भौतिक व शैक्षणिक सुविधा दिल्या आहेत, अशा शाळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याठिकाणी कार्याची प्रत्यक्ष पहाणी करून, समजून घेणे, संबंधित शाळेने केलेले उल्लेखनीय कार्य समजून घेत, आपल्या शाळाही तशाच  करण्याचा प्रयत्न करणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश आहे. एक प्रकारे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना ‘प्रेरणा’ देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११६५ शाळा आहेत. यातील प्रत्येक शाळेतील सहा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळांना भेटी देतील.  असे एकूण जवळपास ६९९० सदस्य २ व ३ नोव्हेंबर १७ दरम्यान केंद्रांतर्गत शाळांना भेटी देतील असे डायट कार्यालयातून सांगण्यात आले.मुख्याध्यापक, शिक्षक मार्गदर्शन करणारया उपक्रमांतर्गत केंद्रातील एका आदर्श शाळेची निवड करण्यात येऊन, तेथे त्या केंद्रातील शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य भेट देतील. त्या शाळेत तेथील मुख्याध्यापक व शिक्षक डिजीटल शाळा, भौतिक सुविधेसाठी लोकसहभाग, स्वच्छ विद्यालय-स्वच्छ महाराष्टÑ, विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी व सर्वंकष विकास, आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शाळांना भेटी दिल्यानंतर केंद्रातील उर्वरित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही आपल्या शाळा डिजीटल करण्यासाठी प्रयत्न करावे, हाच त्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.