शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात यंदा जुन्याच गणवेशावर शाळेचा प्रवेशोत्सव

By admin | Updated: June 14, 2017 17:54 IST

गणवेश खरेदीचे अनुदान अद्याप शाळांना प्राप्त झालेले नाही.

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 14 - दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्याथ्र्याना सर्वशिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश देण्यात येत असत, यावर्षी मात्र  शाळेचा प्रवेशोत्सव जुन्याच गणवेशावर होण्याची चिन्हे आहेत. कारण गणवेश खरेदीचे अनुदान अद्याप शाळांना प्राप्त झालेले नाही.ग्रामीण भागात अजूनही म्हणावे तसेच शैक्षणिक वातावरण नाही. गोरगरीब, अशिक्षित पालक आपल्या पोटाची खळगी भरण्यातच व्यग्र असतात. रोजंदारी किंवा शेतातील कामे बुडवून त्यांना बँकेत चकारा मारायला वेळ नाही. त्यामुळे नवीन बदल ग्रामीण भागातील विद्याथ्र्याच्या दृष्टीकोनातून योग्य ठरणार नाही. असे शिक्षण क्षेत्रातून बोलले जात आहे.गणवेशाची रक्कम आई व मुलाच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतु हे खाते खोलतानाही अडचण येत आहे. एकाच पाल्याची एकापेक्षा जास्त मुले असल्यास संयुक्त खाते उघडण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.सर्वशिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेशासाठी जिल्ह्यात पहिली ते आठवीचे 88 हजार 516 विद्यार्थी पात्र आहेत. यासाठी शिक्षण विभागाने 3 कोटी 54 लाख 6 हजार 400 रुपयाची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. सर्वशिक्षा अभियान अंतर्गत फक्त शासकीय व स्थानीक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमातीची मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील सर्व संवर्गातील पालकांची मुले यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येतो.पालकांना वेळोवेळी सूचना देऊन काही विद्याथ्र्याची अजूनही खातेच उघडले नाहीत. असे शिक्षकांचे म्हणणे आहे.  कारण गणवेशासाठी फक्त 400 रुपये अनुदान आणि खाते उघडण्यासाठी किमान 500 रुपये पालकांना खर्च येतो. त्यामुळे खाते उघडण्याबाबत पालकांची अनुउत्सुकता दिसून येत आहे. या योजनेसाठी विद्याथ्र्याचे नॅशनल, शेडय़ुल्ड, ग्रामीण बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त बँक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे संयुक्त खाते स्वत: पाल्य व त्याच्या आईच्या नावे उघडावे लागणार आहे. ज्या लाभाथ्र्याची आई हयात नाही त्यांचे इतर पालक, अभिभावक यांच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागणार आहे.  इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेशित होणा:या बालकांनाही गणवेशाचे वाटप करण्यात येते. सन 2017-18 मध्ये संभाव्य नव्याने प्रवेशित होणारे गणवेश पात्र लाभाथ्र्याची माहिती असल्यास त्यांचे बँक खाते उघडण्याबाबत सूचना पालकांना देण्यात याव्यात.  इयत्ता पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल होणा:या लाभार्थी विद्याथ्र्याचा निधी व शाळेत नव्याने प्रवेश घेतलेले निकष पात्र लाभार्थी विद्याथ्र्याचा निधी शाळा सुरू झाल्यापासून एक महिन्याच्या आत राखे स्वरूपात स्वत: बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.यावर्षी गणवेश खरेदीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. पालकांनी गणवेश खरेदीची पावती दाखविल्यानंतर अनुदान पाल्याच्या खात्यावर वर्ग होणार आहे. गणवेश खरेदीचे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. तोर्पयत पालकांना गणवेश खरेदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- मोहन देसले, प्राथमिक शिक्षणाधिकारी 

गणवेश खरेदीचे अनुदान अद्याप शाळांना प्राप्त झालेले नाही. तसेच गणवेश खरेदी केल्यानंतर पालकांना गणवेशाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे गरीब पालक गणवेश खरेदी करू शकत नाहीत. तसेच शाळेलाही गणवेश खरेदीचे अधिकार नाहीत. यामुळे गरीब विद्याथ्र्याचे नुकसान होणार आहे. -राजेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती