शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

भर पावसाळ्यातही टंचाई कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:51 IST

कापडणे : ग्रामपंचायतीद्वारे ३५ ते ४० दिवसानंतर नळांना पाणी, ग्रामस्थांची वणवण भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे गावात सलग सहा ते सात महिन्यापासून तीव्र पाण्याची टंचाई भेडसावत आहे. सुरुवातीला पाणीटंचाईची तीव्रता कमी असली तरी सध्या मात्र दोन महिन्यापासून कापडणे येथील काही भागांमध्ये २५ ते ३० दिवसानंतर तर काही लांबच्या भागांमध्ये ३५ ते ४० दिवसानंतर ग्रामपंचायतीद्वारे नळांना पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.सलग तीन ते चार वर्षापासून कापडणे गाव व परिसरात कोरडा दुष्काळ पडत असल्यामुळे जमिनीची जलपातळी प्रमाणापेक्षा जास्त खालावली असल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कापडणे येथील पाणीपुरवठयाचे सर्व जलस्रोत आटले आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी कापडणे येथील सरपंच भटू गोरख पाटील, गटनेते भगवान विनायक पाटील, माजी जि.प. सदस्य रामकृष्ण खलाणे यांनी कापडणे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी करुन पाठपुरावा केला. त्यानंतर दीड महिन्यापासून कापडणे गावात धुळे जिल्हा प्रशासनाकडून २४ हजार लिटर क्षमतेचे दोन पाण्याचे टँकर सुरू होते. प्रत्येक पाण्याचे टँकर दिवसभरातून पाच फेºया कापडणे गावात मारीत होते. मात्र, गावाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या जास्त असल्याने केवळ दोन पाण्याच्या टँंकरवर पाणीटंचाईच्या समस्येचे निवारण होत नव्हते. टँकरद्वारे कापडणे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकून तेथून गडीवरील मोठया जलकुंभात पाणी टाकून गावात टप्प्याटप्प्याने पाणी वितरण केले जात होते. मात्र, प्रत्येक चौकातील महिला व ग्रामस्थ म्हणत होते, आम्हाला ३० दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे टँकर आल्यावर गावातील महिला व पुरुषांनी थेट ग्रामपंचायतीवर व धुळ्यावरून येणाºया टँकरकडे मोर्चा वळविला. अखेर भांडण तंटे करून टँकर चालकाशी हुज्जत घालून थेट टँकरचा ताबा मिळवून आपापल्या परिसरातील सार्वजनिक हाळमध्ये पाण्याचा उपसा करून घेतला. पाणी मिळवण्यासाठी सर्वत्र भांडणे निर्माण होत असल्याने दोन्ही टँकर चालकांनी कापडणे गावात पाण्याचे टँकर आणण्यास नापसंती दर्शवली. व पाण्याचे टँकर बंद झाले.दरम्यान, सरपंच भटू गोरख पाटील यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २१ जुलैपासून पुन्हा एक पाण्याच्या टँकरला सुरुवात झालेली आहे.शेतकºयांनी विहीरी केल्या खुल्याकापडणे येथील शेतकरी शरद भिका बोरसे, अशोक यादव माळी, लहू यादराव माळी, अमोल यादव पाटील, सुभाष शांतीलाल जैन, दगाजी बुधाजी मोरे, दीपक भीमराव बोरसे, सुरेश भीमराव बोरसे, कैलास बडगुजर, संभाजी रघुनाथ पाटील, आनंदा साहेबराव पाटील, गुलाबराव पाटील, साहेबराव दिनकर पाटील, खंडू पाटील, प्रकाश पाटील, विलास उत्तम पाटील, प्रकाश बडगुजर, किशोर गुलाबराव बोरसे, सुनिल रमेश बोरसे, सुनील दगाजी पवार, बाजीराव पाटील आदी शेतकºयांनी आपल्या शेतातील पिकांना पाणी न देता ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी वेळोवेळी उपलब्ध करून दिले आहे.पाण्यासाठी तंटामुक्त गावात तंटेभर पावसाळ्यातही तब्बल ३५ ते ४० दिवसांनी नळांना पाणी येत असल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. तंटामुक्त कापडणे गावात पाणीटंचाईमुळे दररोज तंटे निर्माण होत आहेत. वेळेवर पाऊस होत नसल्याने चिंता वाढली आहे. बंद पडलेले पाण्याचे टँकर नियमित सुरू करण्यात यावेत, असे येथील ग्रामस्थांची मागणी आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे