शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१९३० मध्ये झाला पहिला जंगल सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:50 IST

दिवाळ्यामाळ परिसर

हर्षद गांधी । निजामपूर : धुळे जिल्ह्यात  पहिला ऐतिहासिक जंगल सत्याग्रह साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर दिवाळ्यामाळ  येथे १७ आॅगस्ट १९३० रोजी झाला. फार मोठ्या संख्येत झालेला जनसहभाग ब्रिटिशांना विचार करावयास लावणारा ठरला. या जंगल सत्याग्रहा पाठोपाठ धुळे जिल्ह्यात लळींग, जयनगर,  डांगुणे, कुडावद, धमनार, फत्तेपूर, आमोदे आदी ठिकाणी जंगल सत्याग्रहासाठीप्रेरणा मिळाली. त्या अनोख्या पर्वास ८९ वर्षे लोटलीत.  दरवर्षी आॅगस्ट महिना येताच त्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या होतात.     पंडित नेहरुंच्या अध्यक्षतेखाली १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात सत्याग्रह व असहकाराचे युद्ध करण्याचे ठरले. त्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधी व काँग्रेस कमेटीला देण्यात आले.  जंगल सत्याग्रह प्रचार कार्यात गुंतलेल्या काही कार्यकर्त्यांना अटक व शिक्षा झाली.  धुळे जिल्ह्यात पहिला सामुदायिक जंगल सत्याग्रह १७ आॅगस्ट १९३० रोजी साक्री तालुक्यातील दिवाळ्यामाळ येथे ठरला. निजामपूर, खुडाणे, डोमकाणी रस्त्याच्या दक्षिणेस २ कि.मी.अंतरावर घटबारीच्या  माथ्यावर विस्तीर्ण पठारावर दिवाळ्यामाळचे बंदिस्त व राखीव जंगल होते. तेथील गवत कापून कायद्याचा भंग करण्याचे ठरले. तो दिवस गोकूळ अष्टमीचा होता. आत्माराम पुंडलिक कुलकर्णी, मा. चि. देवरे, यशवंत सखाराम देसले यांच्या नेतृत्वाखालीमालपूर, कासारे, धाडणे, छडवेल पखरूण,सामोडे, पिंपळनेर, निजामपूर, जैताणे, साक्री, डोमकाणी, खुडाणे, छडवेल-कोर्ड या गावांमधून २५ हजारावर सत्याग्रही, शेतकरी, महिला, मुले या आंदोलनात सहभागी झाली होती.पोलिसांची कडी तोडून आंदोलकांनी आत घुसून जंगलातील गवत कापून कायदे भंग केला होता.

टॅग्स :Dhuleधुळे