लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२वीत शिकणारी सानिका उदय शिनकर हिने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामिगिरी केल्याने, तिची जानेवारी २०१९ मध्ये दिल्ली येथे होणाºया राष्टÑीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.राष्टÑीय संघात निवड झाल्याबद्दल तिचा जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ. अरूण साळुंके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक चंद्रशेखर पाटील, डॉ. अनिल चौधरी, संचालिका डॉ. निलिमा पाटील, राजन देशमुख,मुख्याध्यापिका शर्मिला शिंदे, क्रीडा संचालक प्रा. प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते.
बास्केटबॉल स्पर्धेसाठी सानिका शिनकरची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:03 IST