शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘सदगुरु’ सारखा असता पाठीराखा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:04 IST

गुरुपौर्णिमा : जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा, मंदिरात गुरु पुजनाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सदगुरु सारखा असता पाठीराखा असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या भावनेतूनच गुरुपौर्णिमेला गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरु पुजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पालेशा महाविद्यालयधुळे - पालेशा वाणिज्य महाविद्यालयात संस्कार भारती च्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीचे संरक्षक  मदनलालजी मिश्र तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक विलास चव्हाण तसेच प्रमुख पाहूणे म्हणून रत्नाकर  रानडे,  लीलाताई रानडे, केदार नाईक, संस्कार भारतीच्या उपाध्यक्ष जयश्रीताई शाह, वृषाली येवले, शरद साठे उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम  पल्लवी प्रजापत, द्वितीय   रवीना जाधव तर तृतीय पुरस्कार योगेश महाले याला मिळाला. आभार प्राध्यापक प्रशांत बडगुजर तर सूत्रसंचालन प्राध्यापक हेमंत जोशी यांनी केले.पिंपळनेर विद्यालयपिंपळनेर - येथील कर्म. आ. मा. पाटील  महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी. सोनवणे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. डब्ल्यू.बी. शिरसाठ हे होते. याप्रसंगी कु. वैभवी शिंपी, कु. योगेश्वरी सुर्यवंशी, कु. नेहा वाघ,  रविराज एखंडे व कु. मुश्कान शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.एम.बी.एखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.के.डी. कदम, प्रा.डॉ. राम पेटारे, प्रा.डॉ. संजय खोडके हे प्रयत्नशील होते.*दोंडाईचा हस्ती स्कूल*

दोंडाईचा - शहरातील हस्ती स्कुलमध्ये  गुरु वेद व्यास मुनी व हस्तीमल जैन,  शांतीलाल जैन, कांतीलाल  जैन यांच्या प्रतिमांचे पुजन पालकांच्या हस्ते करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी व्यासमुनी, संत ज्ञानेश्वर, गुरुगोविंदसिंग, जिजामाता, सावित्रीबाई फुले, संत जनाबाई, मुक्ताबाई अशा अनेक थोर गुरुंची वेषभूषा केली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरूंचे महत्त्व सांगितले.केमिस्ट संघटनेचा कार्यक्रम

निजामपूर - निजामपूर जैताणे केमिस्ट अँड ड्रग्गीस्ट असो.तर्फे निजामपूर येथे जिल्हा परिषद् कन्या शाळेत १२० विद्यार्थिनींना टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले. यावेळी केमिस्ट संघटनेच्या धुळे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य जगदीश महाले, निजामपूर शहर अध्यक्ष दिनेश मालपुरे, चंद्रकांत पवार, राहुल नावरकर, भागवत शाह, अनिल वारुडे, राकेश गवळे, मुझम्मील मिर्झा, तैय्याब सैय्यद, धनराज शिरोडे यांच्यासह कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सरला चन्ने,आणि शिक्षिका उपस्थित होत्या. गिंदोडिया विद्यामंदीरधुळे - शहरातील ओ.क.गिंदोडिया विद्या मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.जे.बडगुजर तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.प्रा.व्ही.जे. दहिवेलकर ेउपस्थित होत्या. शाळेतील विद्यार्थिनी मयुरी गावीत, योगिता देशमुख, प्रविणा गावीत यानी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन एम.आर.बडगुजर तर आभार अमित चौधरी यांनी मानले.केले वाक्श्रवण विद्यालयधुळे - शहरातील नकाणे रोड येथील केले वाक्श्रवण विकास विद्यालयात मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांच्या हस्ते गुरु- शिष्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील शिक्षिका मनिषा भोई आणि शिक्षक हर्षवर्धन पाटील  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यावर्धिनी महाविद्यालय

धुळे - शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजित  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डि. एस .सुर्यवंशी तर  प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पंजाबराव व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. वैशाली पाटील यांनी  मुला - मुली मधील न्युनगंड बाजुला सारण्यासाठी  कौन्संलीग करण्यात केले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. वंदना चौधरी यांनी केले तर प्रा. बबिता वाडिले, प्रा. वर्षा खोपडे यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन प्रा. उज्ज्वला जाधव यांनी केले. गुरु पूजन व मार्गदर्शन

धुळे - शहरातील  विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक गुरु गौरव महाले यांचे पुजन केले. यावेळी महाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमात प्रियंका जोशी या विद्यार्थिनीने शेतकरी आत्महत्या विषयावर विचार व्यक्त केले. यावेळी ५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गौरव महाले, उमेश भांडारकर, भैय्यासाहेब मगर, संजय सासोटे, महेश बढे व विनोद जाधव हे शिक्षक उपस्थित होते. 

*शिंदखेडा : फोटो विथ माय फर्स्ट गुरु**शिंदखेडा येथे संस्कार बहुउद्देशीय संस्था, शिंदखेडा संचालित शाईनिंग स्टार्स प्री- प्रायमरी स्कुल येथे 'गुरू पौर्णिमा'  निमित्त  फोटो विथ माय फर्स्ट गुरूस  अशा  आगळ्यावेगळ्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडील हे आपले प्रथम गुरू असतात म्हणून लहान विद्यार्थ्यांनी आपापल्या आई वडिलांचा नमस्कार करतानाचा फोटो स्कुलच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठविलेत  त्यांना स्कुल कडून शालेय भेटवस्तू व  झाडाचे एक एक रोप देण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजित निकत, लिपीक मनोज पाटील, संदीप पाटील, प्रा.उमेश चौधरी सर इ.उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मुलांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे