शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वातानुकुलित ९ डबे घेऊन धावले इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:47 IST

धुळे ते चाळीसगाव : इलेक्ट्रिक इंजिनची धुळ्यात यशस्वी चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वाफेवर नंतर डिझेलवर धावणारी धुळे-चाळीसगाव रेल्वे आता लवकरच इलेक्ट्रिक इंजिन घेऊन ताशी ९० किमी इतक्या वेगाने धावणार आहे़ तत्पुर्वी धुळे ते चाळीसगावपर्यंत वातानुकुलित ९ डबे घेऊन इलेक्ट्रिक इंजिन धावल्याने चाचणी यशस्वी झाल्याचा प्रत्यय गुरुवारी आला़ धुळे ते चाळीसगाव पर्यंतचे ५६ किमी इतके अंतर पुर्वी वाफेवर चालणारे इंजिन पार करत होते़ त्यानंतर वाफेच्या इंजिनची जागा डिझेलवर चालणाºया इंजिनने घेतली़ बराच काळ या डिझेलच्या इंजिनने आपली सेवा दिली होती़ यानंतरच्या काळात विजेवर चालणाºया इंजिनसह पुणे आणि मुंबई इथपर्यंत रेल्वे पोहचली पाहीजे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती़ त्याअनुषंगाने गेल्या आठवड्यापासून विजेच्या तारा टाकण्याचे काम सुरु झाले होते़ हे काम पूर्ण होत असल्याने चाळीसगावहून धुळ्यापर्यंत काही अडचणी येतात का, याची चाचपणी करण्यासाठी केवळ इंजिन चाळीसगावहून धुळ्यापर्यंत विना अडथळा पोहचले होते़ ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर वातानुकुलित डब्यासह इंजिन धावू शकते का? याची चाचपणी घेण्यात आली़ त्यात ९ डबे लावण्यात आले आणि ९० किमी ताशी वेगाने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रेल्वे धावली़ इलेक्ट्रिक इंजिन आणि ९ वातानुकुलित डब्यांमध्ये रेल्वेचे अधिकारी आणि काही कर्मचारी विराजमान होते़ धुळ्याहून चाळीसगावपर्यंत रेल्वे धावत असताना कोणत्या प्रकारचे अडथळे येतात का, काही समस्या उद्भवल्यास काय पर्याय करता येईल, रेल्वेचा वेग ताशी ९० किमी इतका आहे का याची सर्वंकष चाचणी यावेळी घेण्यात आली़ त्याचवेळेस नियमित धावणारी धुळे - चाळीसगाव रेल्वेला मात्र अडथळा होऊ दिला नाही़  

१५० कर्मचाºयांची होते विशेष पथकधुळ्याहून चाळीसगाव आणि तेथून मुंबईपर्यंत इलेक्ट्रिक इंजिन आणि वातानुकुलित डब्यांची चाचपणी करण्यासाठी रेल्वे विभागाकडून ए़ के़ जैन (मुंबई), नील बाबरे (मुंबई), अनुप रेलने (रेल्वे अभियंता) आणि धुळ्याचे स्टेशन प्रबंधक सुनील महाजन यांच्यासह १५० रेल्वे विभागाचे पथक तपासणीकामी सज्ज होते़ पथकातील अधिकाºयांनी धुळ्यात येताच प्रबंधक महाजन यांच्याकडून माहिती संकलित केली़  

टॅग्स :Dhuleधुळे