शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयात आरटीईचे प्रवेश सहा वर्षात एकदाही पूर्ण झाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:54 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ६५० विद्यार्थ्यांनी घेतला आहे प्रवेश

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात २०१३ पासून आरटीई प्रवेशाला सुरूवातदरवर्षी जागा वाढल्या, प्रवेश मात्र पूर्ण झाले नाहीयावर्षीही १०० टक्के प्रवेश पूर्ण होणार का? याकडे लक्ष

आॅनलाइन लोकमतधुळे : आर्थिकदृट्या दुर्बल तसेच वंचीत घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आरटीई अंतर्गत बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली. धुळे जिल्ह्यात २०१३ पासून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षात विद्यार्थ्यांचे शंभरटक्के प्रवेश पूर्ण झालेले नाही हे वास्तव आहे. मात्र जिल्ह्यातील दुर्बल घटकातील ३ हजार ६५० विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत मोफत व दर्जेदार शिक्षण मिळू लागले आहे.आर्थिकदृट्या दुर्बल तसेच समाजातील वंचीत घटकातील बालकांना प्रवेश नाकारून विविध शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारून चांगल्याच गब्बर झाल्या होत्या. शाळांच्या या मनमानी कारभाराला शिक्षण हक्क कायद्यामुळे लगाम लागलेला आहे.राज्यातील आर्थिक दुर्बल, सामाजिक वंचीत घटकातील बालकांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा सरकारने लागू केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना कायम विनाअनुदानित व खाजगी विनाअनुदानित शाळेच्या प्रवेशात २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येत असतात.धुळे जिल्ह्यात आरटीई मोफत प्रवेशाची सुरवात २०१३ पासून झाली. २०१३-१४ या वर्षासाठी जिल्ह्यातील ३० शाळांमध्ये १ हजार ६८ विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येणार होता. मात्र पहिल्या वर्षी फक्त २६७ विद्यार्थ्यांनीच मोफत प्रवेशाचा लाभ घेतला. यापैकी ८०१ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात ४१ शाळांमध्ये १ हजार ६४० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेता येणार होता. प्रत्यक्षात फक्त ४१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षी तब्बल १२३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. २०१५-१६ या वर्षात समाधानकारक स्थिती होती. यावर्षी ६८ शाळांमध्ये ७०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी दिली होती. त्यापैकी ६९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.म्हणजे यावर्षी फक्त सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. २०१६-१७ या वर्षात शाळांची संख्या थोडी कमी झाली. यावर्षी ६० शाळांमध्ये ९९५ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी होती. त्यापैकी ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षीही ४९६ विद्यार्थी प्रवेशापासून दूरच राहिले. २०१७-१८ या वर्षात ८१ शाळांमध्ये १ हजार १३४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली होती. मात्र त्यापैकी फक्त ८२१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. तर ३१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच नाही.२०१८-१९ या वर्षात ९३ शाळांमध्ये १ हजार १८१ विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र प्रत्यक्षात ९५९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. २२२ जागा रिक्तच राहिल्या. आरटीई अंतर्गत गेल्या सहा वर्षात ६ हजार ७१८ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेण्याची संधी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर ३ हजार ६८ जागा रिक्त राहिल्या. म्हणजे सहा वर्षात ५० टक्केच प्रवेश झाले. असे असले तरी दुर्बल घटकातील ३ हजार ६५० विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळू लागले हे नाकारून चालणार नाही.दरम्यान गेल्या सहा वर्षात मोफत प्रवेश पूर्ण झालेले नाही. यावर्षीही पहिल्या फेरीचे प्रवेशही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे यावर्षीतरी शंभरटक्के प्रवेश पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे