शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पंजाब नॅशनल बॅँकेतून १० लाख रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:05 IST

धुळे शहरातील भरदुपारची घटना, महिनाभरातील लुटीची दुसरी मोठी घटना, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

ठळक मुद्देदुपारनंतर आझादनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दुपारी उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वी गेल्या महिन्यात अवधान औद्योगिक वसाहतीत उद्योजकास पिस्तूलचा धाक दाखवून १० लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती.अद्याप त्या घटनेतील आरोपी सापडलेले नाहीत, तोच पुन्हा ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : पंजाब नॅशनल बॅँकेच्या शहरातील मुख्य शाखेतून कॅशिअरजवळ वाटपासाठी काढून ठेवलेले १० लाख रूपयांची चोरी झाल्याची घटना बुधवारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. महिनाभरात दुसºयांदा घडलेल्या लुटीच्या अशा घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटना घडल्याचे कळताच नाकाबंदी करण्यात आली. परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या बॅँकेतील चोरीची ही चौथी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी बॅँकेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी कॅशिअरकडे आर्थिक व्यवहारांसाठी सुमारे १० लाख रुपयांची रक्कम ठेवलेली होती. ग्राहकांची गर्दी झालेली होती. याच गर्दीचा फायदा उचलत कॅशिअर मधुकर वाघ यांच्या कक्षाच्या आत जाऊन तेथे व्यवहारासाठी ठेवलेली १० लाखांची रक्कम उचलून चोरट्याने बॅँकेतून पोबारा केला. कॅशिअर वाघ  व शिपाई आनंद सैंदाणे हे दोघे तेव्हा तेथेच होते. मात्र जेव्हा ग्राहकास रक्कम देण्याची वेळ आली तेव्हा पैसे चोरी झाल्याचे कॅशिअर वाघ यांच्या लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. याबाबत लगेच आझादनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव तत्काळ सहकाºयांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासासाठी आवश्यक पाहणी केली. तसेच त्यासाठी बॅँकेचे व्यवस्थापक उदयकुमार सिन्हा, कॅशिअर मधुकर वाघ, शिपाई आनंद सैंदाणे सुरक्षारक्षक दिलीप सोनवणे यांना विचारपूस करून माहिती घेतली. बॅँकेत १६ सीसीटीव्ही  कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. त्यातील छायाचित्रे स्पष्ट नाहीत. परंतु पोलिसांनी ती ताब्यात घेतली. अचानक घडलेल्या या घटनेच्या धक्क्याने बॅँकेचे व्यवस्थापक उदयकुमार सिन्हा व त्यांचा सर्व स्टाफ गोंधळून गेला होता. काही वेळ बॅँकेतील व्यवहार थांबले होते. परंतु नंतर थोड्या वेळानंतर ते पूर्ववत सुरू झाले.