शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोबोट करणार भूमिगत गटारींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:16 IST

महापालिका । कमी मनुष्यबळात होणार स्वच्छता; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील भुमीगत व मोठया गटारींचे मेनहोल स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने दोन क्लिनिंग रोबोट मशिन खरेदी केले आहे़ या मशिनद्वारे शहरातील भूमिगत गटारीची स्वच्छता केली जाणार आहे़ या मशिनचा लोकार्पण खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते शनिवारी झाला़शहरात सद्यस्थितीत असलेल्या भुमिगत व मोठया गटारींचे चेंबर तसेच मेनहोल चोकप झाल्यानंतर स्वच्छतेसाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात येत होता. मॅनहोलमध्ये जमा झालेल्या ठिकाणी तीव्र उष्णता आॅक्सीजनची कमतरता व विषारी वायुमुळे राज्यात अनेक सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे मॅन्युअल स्कॅव्हींगला भारतात बंदी घातलेली आहे़ ही स्वच्छतेची पध्दत बंद होण्यासाठी व तांत्रिक मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे़ यासाठी रोबोट तयार करण्यात आले आहे़ कचऱ्यांचे प्रभावी व कार्यक्षम व्यवस्थापन करुन शहरातील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यासाठी या शास्त्रोक्त पध्दतीचा उपयोग होणार आहे़ या कामी भारत पेट्रोलियम कंपनीने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार आयुक्त अजिज शेख यांनी मानले़यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे, स्नेहल जाधव, नगरसेवक राजेश पवार, देवेंद्र सोनार, रावसाहेब नोंद्रे, दगडू बागुल, प्रवीण अग्रवाल, उपायुक्त गणेश गिरी, सहा. आयुक्त शांताराम गोसावी, अभियंता कैलास शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सहाय्यक आरोग्य चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. आभार सहाय्यक आयुक्त विनायक कोते यांनी मानले़

टॅग्स :Dhuleधुळे