लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : पाच ते सहा जणांनी अडवत चाकुसह हाताबुक्यांनी मारहाण करत तेलाच्या व्यापाºयाला लुटल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील बोराडी घाटात सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ त्याच्याकडे असलेले ५ लाख ३० हजाराची रक्कम घेवून लुटारु पसार झाले़ या व्यापाºयाला जबर मार लागला असून या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ सोनगीर वाघाडी येथे राहणारा सोनू विक्रम चित्ते (२८) हा तेलाचा होलसेल व्यापारी आहे़ परिसरातील व्यापाºयांकडे तेल पुरविल्यानंतर त्याची रक्कम घेण्यासाठी तो या भागात अधून-मधून फिरत असतो़ अशाच तो तेलाचे पैसे गोळा केल्यानंतर बोराडीकडून शिरपूरकडे एमएच १८ डीए ५१६८ या क्रमांकाच्या दुचाकीने येत होता़ त्याच्यासोबत अन्य कोणीही नव्हते़ तो शिरपूरकडे येत असताना बोराडी घाटात त्याच्या येण्यापुर्वीच ५ ते ६ जणं दबा धरुन बसले होते़ त्याच वेळेस हा व्यापारी बोराडी घाटात येताच त्याला अडविण्यात आले़ त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले़ छातीवर आणि पाठीवर हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली़ या मारहाणीत तो जबर जखमी झाला आहे़
चाकूचा धाक दाखवत व्यापाºयाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:43 IST
बोराडी घाटातील घटना : ५ लाख घेवून पसार
चाकूचा धाक दाखवत व्यापाºयाला लुटले
ठळक मुद्देशिरपूर तालुक्यातील बोराडी घाटात अशा वेळोवेळी लुटमारीच्या घटना घडत असतात़ सोमवारी घडलेल्या या थरारक घटनेमुळे सोनू चित्ते याला जीव गमवावा लागला असता़ जखमी अवस्थेत तो वाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला असून डॉ़ योगेश पाटील यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले़