शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बोराडीत एकाच रात्री चार ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:40 IST

हजारोंचा ऐवज लंपास : गावात एकच चर्चा

शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथे एकाच रात्री बंद असलेली तीन घरे आणि एक किराणा दुकान चोरट्यांनी फोडले़ यात हजारो रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे़ तसेच विशेष म्हणजे हे चारही घरातील लोक बाहेर गावी गेलेले होते. ही संधी चोरट्याने साधली़ या घटनेमुळे बोराडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बोराडी येथील बडगुजर गल्लीतील संजय किराणा दुकान, शिवाजी नगरातील संजय सूर्यभान पवार, कर्मवीर नगरमधील अजय गंगाराम बडगुजर व देवमोगरा कॉलनीतील शिलाबाई पाटील हे चारही घर मालक बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्याने साधली़ चोरट्यांनी पहाटे एक ते दोन वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़किराणा दुकानदार घरी नसल्यामुळे किती पैसे गेले हे अजून समजले नाही. तर शिलाबाई पाटील यांच्या घरातील कपाटातून पंधरा हजार रुपये तसेच अजय बडगुजर यांच्या घरातील कपाटातून एक पाच ग्रम सोन्याची अंगठी व पाच हजार रुपये रोख तर संजय पवार यांच्या घरातून एक तोळे सोने व तीन हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्याने लांबविला आहे़ ही घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली़बोराडी गावात चोरी झाल्याची माहिती मिळताच सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, बीट हवालदार पी. पी. मोरे, संजय जाधव, संजय देवरे, भुषण चौधरी, सुरेश ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामे केले आहेत. त्यानुसार चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, बोराडी गावात या एकच विषयावर ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी