हद्दीतील वार्ड क्र.६ हा संपूर्ण भाग गेल्या ३० वर्षांपासून नवीन रहिवासी क्षेत्र उदयास आला आहे. या भागातील मातीवर असलेल्या शेतजमिनी या बिनशेती होऊन त्यावर रहिवासी क्षेत्र झाले आहे. आजमितीस या भागातील १०० च्या वर गट बिनशेतीकडे वर्ग झालेले आहे. या भागातील लोकसंख्या अंदाजे ८ हजार ते १० हजार पर्यंत पोहचली आहे. ग्रामपंचायतीस मालमत्ता कर स्वरूपात गोळा होणाऱ्या रकमेच्या निम्म्याहून अधिक उत्पन्न हे या भागातून जमा होत असते. त्या तुलनेत गेल्या अनेक वर्षात त्या ठिकाणी कच्च्या अथवा पक्क्या रस्त्यांची निर्मिती झालेली नाही. पावसाळ्यात या भागातील लोकांना घरी नव्हे तर आपल्या वसाहतीपर्यंत पोहचणे देखील शक्य होत नाही. येथील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात. तसेच या भागात रस्ते करण्यात यावेत, विकास कामे करण्यात यावीत, अशी मागणी वरील तीन सदस्यांनी केलेली आहे.
नवीन वसाहतीत रस्त्यांची कामे करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST