बोरसे कॉलनीत गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती. त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करणासाठी नागरिकांना समस्यांचा सामोरे जावे लागत होते. या ठिकाणी आमदार फारूक शाह पाहणी करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार स्थानिक विकास निधीतून बोरेसे कॉलनी येथे २० लाखांच्या निधीतून काँक्रीट रस्ते केले जाणार आहे. या विकास कामांचा शुभारंभ आमदार फारूक शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी मनपाचे नगसेवक युसुफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष, वसीम अक्रम, शहराध्यक्ष सेहबाज शाह, मुजम्मील शाह, परवेज शाह, नीलेश काटे, ईबा ठेकेदार, समद पठाण, आशिष सोनार, एजाज सैय्यद आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
त्या भागातील रस्त्याचा होणार आता कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST