शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर ते फागणे चौफुली रस्ता रूंदीकरणाचे काम वेगात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:24 IST

१४९.७५ कोटीचा निधी मंजूर,  दोन वर्षात पूर्ण होणार रस्त्याचे काम

ठळक मुद्दे३० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रूंदीकरणाच्या कामास सुरवात झालेली आहे.या रस्त्यावर असलेले पाईप मोरीचे पुलांचेही रूंदीकरण करण्यात येणार१० वर्षे रस्ता दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडेच राहणार आहे. 

आॅनलाइन लोकमतधुळे : केंद्र शासनाच्या एएनयुटीआय योजनेंतर्गत मेहेरगाव (ता. धुळे) ते अमळनेर या ५३.७४ किलोमीटर अंतराचा रस्ता १० मीटर रूंदीचा होणार असून, त्यासाठी १४९.७५ कोटी रूपये मंजूर झालेले आहेत. दोन वर्षात या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. तूर्त अमळनेर ते फागणे चौफुली (ता.धुळे) दरम्यान रस्ता रूंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे.केंद्र शासनाने प्रथमच एएनयुटीआय ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत  एनएसके ५८ हा मेहेरगाव ते धुळे, फागणे ते नवलनगर, अजंग ते नवलनगर व नवलनगर ते अमळनेर असा रस्ता तयार करण्यात येत आहे. आॅगस्ट २०१८ पासून फागणे ते अमळनेर दरम्यानच्या ३० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रूंदीकरणाच्या कामास सुरवात झालेली आहे.हे काम वेगात सुरू आहे. गावाच्या ठिकाणी कॉँक्रीटकरणया रस्त्यांतर्गत असलेल्या गावाच्या ठिंकाणी रस्त्याचे कॉँक्रीटीकरण करण्यात येणार असून, रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारीही बांधण्यात येणार आहे. गाव वगळता उर्वरित रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे रस्ता दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडेच राहणार आहे. रस्ता सलग तयार करणारपूर्वी टप्या-टप्यात रस्त्याचे काम करण्यात येत होते. मात्र केंद्र शासनाच्या या नवीन योजनेमुळे एकच ठेकेदार हे काम करणार आहे. या रस्त्यावर असलेले पाईप मोरीचे पुलांचेही रूंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शाह यांनी दिली.  रस्ता रूंदीकरणाच्या मार्गात अडथळे ठरणारे झाडे तोडण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. येत्या दोन वर्षात रूंदीकरणाचे काम पूर्ण होईल.

टॅग्स :Dhuleधुळे