ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.15- दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरुन नितीन सुरेश परदेशी या तरुणावर कु:हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ याप्रकरणी संशयित तिघांविरुध्द शहर पोलिसात फिर्याद दाखल झाली आह़े
नितीन सुरेश परदेशी (30) रा़ शनिनगर, साक्री रोड धुळे या रिक्षा चालकाने फिर्याद दाखल केलेली आह़े दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही याचा राग आल्याने कोल्हाभाऊ उर्फ मालचे, महेंद्र आणि राकेशचा भाऊ दादू (या तिघांचे संपूर्ण नाव निष्पन्न नाही) यांनी संगनमताने मारहाण केली़ एकाने कु:हाडीने डोक्यावर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ महेंद्र व एकाने काठीने हातापायावर मारहाण केली़ ही घटना एफसीआय गोडावून समोर, जमनागिरी रोड या भागात घडली़ यात नितीन याला जबर दुखापत झालेली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही़ ओ़ वसावे करीत आहेत़