शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवधान शिवारातील हॉटेलवर रिव्हॉल्व्हर, लोखंडी रॉडचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:20 IST

मोहाडी पोलीस : १३ जणांविरुध्द गुन्हा, घटनेमुळे परिसरात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात एका हॉटेलवर शनिवारी रात्री रिव्हॉल्व्हर, लोखंडी रॉडसह तलवारी काढल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते़ छातीवर बंदूक रोखून तलवारीने वार करण्याचा प्रयत्न झाला़ मात्र, प्रसंगावधान राखत जीव वाचविल्याने दोघांना दुखापत झाली़ याप्रकरणी संशयित १३ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ मोहाडी उपनगरात राहणाºया अजय विश्वास मरसाळे व किस्मतसिंग भादा यांच्यात पुर्वीपासून वाद आहे़ शनिवारी रात्री अजय मरसाळे हा अवधान शिवारात एका हॉटेलवर आला़ त्याचवेळेस काही जण त्या हॉटेलवर पोहचले़ त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून अजय मरसाळे याला मारहाण सुरु केली़ ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी त्याचा मित्र धीरज राजेंद्र सोनार हा मध्यस्थी करण्यास धावला़ आलेल्यांपैकी एकाने तलवारीने मान छाटण्याचा प्रयत्न केला़ तर दुसºयाने पिस्तुल रोखून शिवीगाळ केली़ यावेळी धीरज सोनार याठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही जबर मारहाण करण्यात आली़ जीव वाचविण्यासाठी तो महामार्गाच्या पलिकडच्या दुकांनाकडे पळाला असता त्याच्या दिशेने लोखंडी रॉड फेकून मारल्याने त्यात तो जखमी झाला़ यावेळी त्याच्या खिशातील ३ हजार रुपये देखील बळजबरीने काढून घेण्यात आले़ या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मोहाडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली़ जखमी झालेल्या दोघांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर रविवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अजय विश्वास मरसाळे (२४, रा़ पंजाबी कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे) याने मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, संशयित किस्मतसिंग भादा, मिलनसिंग भादा, कबीर विजय सोनवणे, गजानन उर्फ भोंद्या कोळी, राहुल उर्फ विक्की शरद कोळी, हेमंत संजू हाके, अतुल उर्फ काल्या कोळी, अक्षय संजू हाके, आबा वाडेकर, सुनील जाधव, गणेश उर्फ डमरू गण्या सोनवणे, करण सोनवणे आणि अजय (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात भादंवि कलम ३९७, ५०४ तसेच आर्म अ‍ॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक डी़ एस़ मोरे घटनेचा तपास तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी