शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांच्या आंदोलनामुळे महसूल कामावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:43 IST

चतुर्थ श्रेणीत समावेशासह विविध मागण्या : सलग २७ दिवसांपासून सुरू काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने १९ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. नासिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोरही आंदोलन गेल्या २७ दिवसांपासून सुरू आहे. महसूल विभागातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करावा ही कोतवालांची ४०-५० वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीसाठी राज्यातील सर्व कोतवाल नासिक येथे आंदोलनात सहभागी झाले आहेत. संपूर्ण राज्यभर कोतवालांचे बेमुदत काम बंद आंदोलनामुळे या दरम्यान धुळे जिल्ह्यातील महसूल विभागांतर्गत येणाºया कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.नाशिक येथील आंदोलनात कोतवालांच्या मागण्या अशा आहेत.   शासनाने वेळोवेळी कोतवालांची दिशाभूल करून ४०-५० वर्षापासून कोतवालवर अन्याय करत आहे. २४ तास शासनाची सेवा बजावणे, शासनाची वसुली करणे, निवडणुकीची कामे इत्यादी २०० ते २५० कामे कोतवाल करत आहे. एवढे असूनही शासन कोतवालांच्या मागणी बाबत सकारात्मनक निर्णय घेत नसल्यामुळे कोतवालवर्गात नाराजीचा सुरू येत आहे. तसेच गेल्या २७ दिवसापासून नासिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपल्या मागणीसाठी कोतवाल लढा देत आहेत. परंतु शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने सुरू असलेले आंदोलन हे जोपर्यंत शासन कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करत नाही तोपर्यंत नासिक विभागीय आयुक्त कार्यालया समोरील आंदोलन हे सुरुच राहणार, असा पक्का निर्धार महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या सर्व पदाधिकाºयांनी केलेला आहे, असे मत राज्य संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले यांनी व्यक्त केले आहे. या आंदोलनात उपाध्यक्ष सुमित गमरे, सरचिटणीस भारत पवार, मार्गदशक बापू आहिरे, राज्य संपर्क प्रमुख बाळू झोरे, नितीन चंदन, रवींद्र भामरे, विवेक देशमुख, गणेश गोसावी, जयवंत जाधव, पदाधिकारी व कोतवाल सहभागी आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे