शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी सांभाळली मतदान केंद्राची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:21 IST

प्रेरणादायी : पाच रणरागिणींनी सांभाळला कारभार, स्वयंसेवकांनी महिला मतदारांचे केले स्वागत

धुळे : लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागा संबंधातील वचन बद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले स्वतंत्र महिला मतदान केंद्र तयार केले होते. त्याला 'सखी मतदान केंद्र' असे नाव देण्यात आले होते. धुळे शहरातील उन्नती शाळेतील देवपूर पूर्वेकडील खोली क्रमांक १ मध्ये हे मतदानकेंद्र तयार करण्यात आले होते. या केंद्रावर पाच महिलांनी मतदान केंद्राची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.लालरंगाची मॅट, गुलाबी पडदे, रांगोळी आदींनी सजविलेले हे केंद्र मतदारांचे आकर्षण ठरले होते. उन्नती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच सखी मतदारसंघाचा फलक लावण्यात आला होता़ या प्रवेशद्वारापासून ते मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी लाल रंगाची मॅट टाकण्यात आली होती. प्रवेशद्वाराजवळच तरूणी स्वयंसेवकांमार्फत मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करण्यात आले होते. मतदान केंद्रही आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. मतदान केंद्रात रंगीबेरंगी पतका लावण्यात आलेल्या होत्या. त्याचबरोबर मतदान कर्मचारी ज्या ठिकाणी बसतात त्या टेबलावरही गुलाबी रंगाचा कापड आंथरण्यात आलेला होता. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान करण्यात येत होते,त्यालाही सजविण्यात आले होते.सायंकाळी सहा वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण करीत मशीन सील करण्यात आले़यासोबतच एक महिला पोलीस कर्मचाºयाची याठिकाणी नियुक्ती केली होती.उन्नती शाळेतील ४३ क्रमांकाच्या या केंद्रांवर केंद्राध्यक्ष मालती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी ज्योती पाटील, रंजना साळुंखे, सरिता शिंपी व मदतनीस मनीषा वारूळे यांनी कामकाज पाहिले. शहरात असलेल्या एकमेव ‘सखी’ मतदान केंद्राची सर्वत्र चर्चा होती.

टॅग्स :Dhuleधुळे