यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. पंकज गोरे, उपजिल्हाप्रमुख भुपेश शहा, कासारे गावाचे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले, तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कासारे गटाची बैठक कासारे ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.
डॉ. तुळशीराम गावित, सरपंच विशाल देसले, आमदार मंजुळा गावित, प्रियंका जोशी यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी उपतालुकाप्रमुख भरत जोशी, युवतीसेना जिल्हा समन्वयक प्रियंका जोशी, माजी तालुकाप्रमुख किशोर वाघ, सुभाष देसले,अशोक सोनवणे, प्रतापूर सरपंच ऋतुराज ठाकरे, विटाई सरपंच अशोक सावळे, छाईलचे दिलीप सुवर, विभागप्रमुख विपुल गांगुर्डे, उपविभाग प्रमुख नीलेश कुवर, कासारे ग्रामपंचायत सदस्य दीपक चौधरी, रवींद्र चव्हाण, विलास सोनवणे, स्वप्नील देसले, युवासेना तालुकाप्रमुख बाळा देवरे, युवासेनेचे जिवा पाटील, तुषार जगदाळे, मयूर अहिरे, आदी उपस्थित होते.