शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

उमवि उपकेंद्राला विनामूल्य जागा देण्याबाबतचा ठराव अखेर विखंडित!

By admin | Updated: January 31, 2017 23:58 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी विनामूल्य देण्याचा ठराव 13 जानेवारीला मनपा महासभेत करण्यात आला होता. मात्र सदरचा प्रस्ताव शासनाने अंतिमत: विखंडित केला

धुळे : शहरातील प्रभातनगरातील सि़स़नं. 111 व 112 अ ची 8 हजार 96 चौ.मी. जागा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी विनामूल्य देण्याचा ठराव 13 जानेवारीला मनपा महासभेत करण्यात आला होता. मात्र सदरचा प्रस्ताव शासनाने अंतिमत: विखंडित केला असून त्यामुळे धुळ्यात उमवि उपकेंद्र होण्याची आशा मावळली आह़ेमनपाच्या मालकीची देवपूर भागात असलेली सव्र्हे नं. 111 व 112 अ ही 8 हजार 96 चौ.मी. (8096 चौ. फूट) जागा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला विनामूल्य हस्तांतरित करून देण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव 13 जानेवारी 2016 ला झालेल्या महासभेत करण्यात आला होता़  महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी 21 मार्च 2016 ला उमवि उपकेंद्राबाबत महासभेत झालेला ठराव विखंडित करण्याचा अभिप्राय देत शासनाला पाठविला होता़ अभिप्राय देताना आयुक्तांनी प्रश्नाधीन जागा ही आकाराने कमी असल्याने त्या जागेवर होणारी वाहतूक गर्दी विचारात घेता उपकेंद्रासाठी देणे योग्य होणार नाही, सदर जागा व्यापारीदृष्टय़ा विकसित केल्यास मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढेल, सुधारित मंजूर विकास योजनेत सदर जागा ही सार्वजनिक, निमसार्वजनिक विभागात समाविष्ट आहे, या जागेत व्यापारी संकुल उभारावयाचे झाल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 (1) नुसार वापरात फेरबदल करता येतील़ मनपा हद्दीबाहेर नगाव सव्र्हे क्रमांक 287+418 व 292 या सरकारी जागेत उमवि उपकेंद्रास जागा देणे उचित होईल त्यामुळे सदरचा ठराव विखंडित करण्यात यावा, असे नमूद केले होत़े त्यानुसार सदरचा ठराव निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र मनपाला जुलै महिन्यात प्राप्त झाले होते. त्यावर तत्कालीन महापौर जयश्री अहिरराव यांनी अभिवेदन सादर करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ही व्यापारी संस्था नसल्याने त्यांच्याकडून बाजारमूल्य किंवा भाडे घेणे योग्य ठरणार नाही, असे नमूद केले होत़े त्याचप्रमाणे शहरातील मच्छीबाजार भागात पोलीस चौकीसाठी मनपा मालकीची जागा रेडिरेकनर दरानुसार निश्चित केलेल्या मूल्यांकन रकमेपैकी 10 टक्के नाममात्र शुल्क घेऊन जागा देण्यात आली असल्याचा दाखला दिला होता व त्यानुसारच उमवि उपकेंद्रास नाममात्र शुल्क घेऊन जागा देण्याची मागणी केली होती़ परंतु मनपा अधिनियमातील कलम 79 (ड) मध्ये मनपाच्या मालमत्तेचा विनियोग करण्यासंदर्भात तरतुदी विशद असून त्यानुसार मनपा मालकीची कोणतीही स्थावर मालमत्ता विकताना, भाडेपट्टय़ाने देताना किंवा हस्तांतरण करताना घ्यावयाचा मोबदला हा चालू बाजार किमतीपेक्षा कमी असू नये असे नमूद आह़े त्यामुळे महासभेने केलेला ठराव अधिनियमातील तरतुदींशी विसंगत असल्याने तो अंतिमत: विखंडित करण्याचे शासनाने जाहीर केले आह़े त्यामुळे उमवि उपकेंद्राची अपेक्षा संपुष्टात आली आह़े