धुळे : शहरातील माजी नगरसेवकाच्या भावाचा २३ एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्या मृत व्यक्तीच्या पत्नीचे व आईचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत ४८८ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत तर २१ जण पॉजीटीव्ह आढळले आहेत.येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आलेल्या स्वॅब नमून्यापैकी शनिवारी ४८६ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २१ आहे. त्यात धुळयातील ३ आणि साक्रीतील एक असे एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
त्या माजी नगरसेवकाच्या परीवारातील दोघांचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:59 IST