शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

रिलायबलच्या नकाराने प्रशासनाची गोची, कचऱ्याच्या प्रश्नावरुन सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 22:04 IST

महापालिकेची स्थायी समितीची बैठक : सभापती सुनील बैसाणे यांनीही विचारला जाब

धुळे : येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कचºयाचा प्रश्न पुन्हा पेटला. कचरा संकलनामध्ये वॉटरग्रेस कंपनी असमर्थ ठरल्याने ठेका रिलायबलला देण्याचे ठरले. मात्र रिलायबलने ऐनवेळी नकार देत महापालिका प्रशासनाला तोंडघशी पाडले. हाच मुद्दा धरुन सदस्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. सभापती सुनील बैसाणे यांनी देखील शंका उपस्थित केल्याने हा मुद्दा वादाचा ठरला.येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती सुनील बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.स्थायी समितीच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे वॉटरग्रेस आणि रिलायबल या दोन कंपन्या भौवती चर्चा फिरली. माजी सभापती युवराज पाटील यांनी कचऱ्याचा प्रश्न मांडला. ते म्हणाले, शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. जनता आता आमच्या दारापुढे कचरा टाकू लागले आहेत. अमोल मासुळे म्हणाले, वॉटरग्रेसचे काम योग्य नसल्याने त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले जाणार होते. मात्र त्यांनी कार्यमुक्ती मागितल्याने ब्लॅकलिस्टेड केले गेले नाही. वॉटरग्रेस डच्चू देत रिलायबलला काम दिले जाणार होते. मात्र या कंपनीने काम सुरु करण्यापुर्वीच नकार का दिला. प्रशासन वॉटरग्रेसला पाठीशी घालत आहेत का, असा सवालही त्यांनी केला. नगरसेवक संतोष खताळ म्हणाले, वॉटरग्रेसवर कारवाई न करु शकणे म्हणजेच महापालिकेची नामुष्की आहे. यातून प्रशासन हतबल दिसत आहे. वॉटरग्रेसच्या भरवशावर कचरा संकलनाचे काम कसे होणार, नागरीकांना सुविधा मिळत नाही, वॉटरग्रेसचा मनमानी कारभार यापुढे सहन केला जाईल का, असा सवालही उपस्थित केला. सभापती बैसाणे यांनी देखील वॉटरग्रेस कंपनीवर टिकेचे बाण सोडत काम न करता बिल कसे अदा केले गेले असा सवाल उपस्थित केला.कमलेश देवरे यांनी देवपुरातील रस्त्यांच्या समस्यांबाबत पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला. भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत, मात्र रस्त्यांची कामे झालेली नाहीत. आता ठेकेदारावर कोणती कारवाई होईल असा सवाल उपस्थित केला. यावर अभियंता शिंदे म्हणाले, भूमिगत गटारीचे काम समाधानकारक नाही. त्यांच्याकडे पुन्हा तक्रार केली जाईल. त्यांनी ऐकले नाहीतर शेवटी निविदा रद्द करण्यासंदर्भात राज्यशासनाकडे पत्र व्यवहार केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे